Cristiano Ronaldo saudi Club offered 1800 crore : पोर्तुगालचा (Portugal) स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोने (cristiano ronaldo) सध्या फुलबॉल फिफा वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये सध्या कतारमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. पण मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबला गुडबाय केल्यानंतर तो आता कुठल्या क्लबकडून खेळणार हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. रोनाल्डोला एका क्लबकडून मोठ्या रक्कमची ऑफर मिळालाची माहिती समोर आली आहे.
सौदी अल नासारकडून (Saudi Giants Al Nassr) रोनाल्डोला 18.6 कोटी पौंड स्टर्लिंगची ऑफर देण्यात आली आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार 1800 कोटींची ऑफर आहे. अलीकडच्या काही दिवसांत, क्रिस्टियानो रोनाल्डोने पियर्स मॉर्गनला एक स्फोटक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक मुद्द्यांवरून मँचेस्टर युनायटेड क्लबवर टीका केली. त्यानंतर त्याने तात्काळ प्रभावाने क्लब सोडण्याचा निर्णय घेतलाय. (Cristiano Ronaldo saudi Club offered 1835 crore trending news) दरम्यान आज पुन्हा एकदा ख्रिस्तियानो रोनाल्डो फिफा विश्वचषक 2022 च्या मैदानात उतरणार आहे. आज त्याच्या खांद्यावर पोर्तुगालला अंतिम 16 चे तिकीट मिळवून देण्याची जबाबदारी असेल. स्पर्धेत सोमवारी 4 सामने खेळवले जाणार आहेत. दिवसाचा पहिला सामना कॅमेरून आणि सर्बिया (Cameroon vs Serbia) यांच्यात होईल, दुसरा सामना दक्षिण कोरिया विरुद्ध घाना (South Korea vs Ghana) यांच्यात होईल, तिसरा सामना ब्राझील आणि स्वित्झर्लंड (Brazil vs Switzerland) यांच्यात होईल, तर शेवटचा सामना रात्री उशिरा पोर्तुगाल आणि उरुग्वे (Portugal vs Uruguay) यांच्यात होईल.
37 वर्षीय रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडसाठी 346 सामन्यांत 145 गोल केले आहेत. तो या क्लबकडून दोनदा खेळला आहे. पोर्तुगालच्या कर्णधाराने 2009 मध्ये पहिल्यांदा क्लब सोडला आणि रिअल माद्रिदमध्ये सामील झाला. यानंतर, त्याने स्पॅनिश क्लब माद्रिदकडून (Spanish club Madrid) खेळताना सर्व यश मिळवले. यादरम्यान, तो पाच वेळा बॅलन डी'ओर विजेता देखील होता. माद्रिदनंतर, रोनाल्डो इटालियन क्लब जुव्हेंटसमध्ये (Italian club Juventus) सामील झाला आणि तीन वर्षे या क्लबसाठी खेळला. यानंतर रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला.
एकीकडे फुलबॉलप्रेमींवर FIFA चा भूत चढलं आहे अशात FIFA कोण जिंकणार यापेक्षा रोनाल्डो ही ऑफर स्वीकारणार का, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.