मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा बोल्ड अंदाज सिनेमात

मोहम्मद शमीवर गंभीर आरोप करणारी तिची पत्नी हसीन जहां आता बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार आहे. 

Surendra Gangan Updated: Jul 11, 2018, 08:00 PM IST
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा बोल्ड अंदाज सिनेमात  title=

मुंबई : टीम इंडियाचा जलगती गोलंदाज मोहम्मद शमीवर गंभीर आरोप करणारी तिची पत्नी हसीन जहां आता बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार आहे. तिने आधी मॉडेलिंग क्षेत्र करिअरसाठी निवडले होते. आता ती हिंदी सिनेमात बॉल्ड भूमिकेत असणार आहे. ती चक्क पत्रकाराच्या भूमिकेत असणार आहे. दरम्यान, क्रिकेट पटू मोहम्मद शमीवर फसवणूक, बलात्कार व हत्येचा प्रयत्न गंभीर आरोप केलाय. त्यानंतर ती एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली.

हसीन जहां मॉडेलिंग पाठोपाठ सिनेमात अभिनेत्री म्हणून करिअर करणार आहे. लवकरच ती दिग्दर्शक अमजद खानच्या ‘फतवा’ या सिनेमातून एंट्री करणार असून त्यामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी हसीन जहांने खास बोल्ड फोटोशूट केले आहे. महिला पत्रकाराचा डॅशिंग लूक 'फतवा'मध्ये पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, याआधी हसीनने शमीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यात तिने शमीवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. शमीचे अनेक तरुणींशी विवाहबाह्य संबंध असून त्याचा मॅच फिक्सिंगमध्येही हात असल्याचा गंभीर आरोप तिने केला होता. तसेच शमीने त्याच्या भावाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली. आपली हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असाही आरोप केला. मोहम्मद शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. बीसीसीआयनेही शमीला क्लीन चीट दिली होती.