माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.       

Updated: Oct 23, 2020, 03:35 PM IST
माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका title=

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयातउपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे समस्त क्रिकेट प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कपिल देव यांना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास फोर्टीस रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. 

दरम्यान छातीत दुखत असल्यामुळे ते तपासणीसाठी फोर्टीस रुग्णालयात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून रात्री अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांना रुग्णालयातून कधी सुट्टी मिळेल हे मात्र अस्पष्ट आहे. 

भारताला पहिलं विश्वचषक मिळवून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांच्या दिर्घायुष्यासाठी आता समस्त क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटपटू प्रार्थना करत आहे. १८८३ साली त्यांनी भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून दिला.