IND VS ENG:इंग्लंडवर दुसऱ्यांदा नामुष्की, पराभवानंतर ठोठावला दंड

इंग्लंड संघाला का ठोठवण्यात आला दंड. आज शेवटचा सामना रंगणार

Updated: Mar 20, 2021, 09:03 AM IST
IND VS ENG:इंग्लंडवर दुसऱ्यांदा नामुष्की, पराभवानंतर ठोठावला दंड title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड आज शेवटचा आणि पाचवा टी 20 सामना होत आहे. 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 2-2 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर संघाला मोठा धक्का बसला आहे.

चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंड संघाचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर दंड आकारण्यात आला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना त्याच्या सामन्याच्या फी पैकी २० टक्के दंड आकारण्यात आला आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने एलिट पॅनेल मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी हा दंड ठोठावला आहे.  

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आयसीसीने ठरवून दिलेल्या आचार संहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी हा दंड लावण्यात आला आहे. ICC आचार संहिता कलम 2.22 किमान वेगाच्या उल्लंघनासंबंधित हा दंड लावण्यात आला आहे. हा दंड मॉर्गनने स्वीकारला असून तो भरणार आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड आज काँटे की टक्कर असा सामना असणार आहे. मालिकेवर कोण विजय मिळवणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सीरिजवर विजय मिळवण्यात भारतीय संघाला यश आलं होतं. आज टी 20 सामना जिंकण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.