IPL 2024 Host: आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. येत्या मार्च महिन्यात क्रिकेट जगतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग खेळवली जाणार आहे. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक अद्याप यायचं आहे. पण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात IPL 2024 ला दणक्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण यावेळची आयपीएल स्पर्धा भारतात होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ज्यावेळी IPL 2024 स्पर्धा होणार आहे, त्याचवेळी देशात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
आयपीएल स्पर्धा जवळपास दोन महिने खेळवली जाते. साधारणत: याच महिन्यात लोकसभा निवडणूकीचा (Loksabha Election 2024) काळ असेल. वेगवेगळ्या टप्प्यात होणारी लोकसभा निवडणू मे महिन्याच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यताआहे. म्हणजे संपूर्ण आयपीएल स्पर्धेदरम्यान देशात लोकसभा निवडणुकीची धूम असणार आहे.
2009 मध्ये आयपीएल देशाबाहेर
आयपीएल देशाबाहेर होण्याची पहिलीच वेळ नाहीए. याआधी 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 मध्येही लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धा भारत आणि युएईमध्ये खेळवण्यात आली. आता पुन्हा एकदा 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आणि आयपीएल स्पर्धेचा काळ एकच आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धाही देशाबाहेर होण्याची शक्यता आहे.
आयपीएल परदेशात खेळवण्याचं कारण?
लोकसभा निवडणूक आणि आयपीएल स्पर्धंचा संबं असा प्रश्न सामान्य विचारतायत. पण यामागे मोठं कारण आहे. आयपीएल ही देशातली सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. पूर्ण दोन महिने ही स्पर्धा खेळवली जाते. यादरम्यान स्टेडिअमवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात केली जाते. लोकसभा निवडणुकीमुळे सुरक्षेत कपात होऊ शकते. कारण लोकसभा निवडणुकीदरम्यान देशात सर्वत कडेकोड बंदोबस्त ठेवला जात. निवडणुक काळात कोणताही गोंधळ होऊ नयेत याची काटकोर खबरदारी घेतली जाते. त्यामुळे निवडणूक काळात क्रिकेट सामने झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याच कारणाने याआधीही दोनवेळा आयपीएल स्पर्धा भारताबाहेर खेळवण्यात आली होती.
आयपीएल-लोकसभा एकत्र होण्याची शक्यता
2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीवेळी आयपीएल स्पर्धा देशाबाहेर खेळवण्यात आली होती, पण 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यानच आयपीएल स्पर्धा भारतातच खेळवण्यात आली. निवडणूक आणि क्रिकेट सामन्यांदरम्यान सुरक्षा व्यवस्थेचं संतुलन ठेवण्यात आलं. आयपीएल सामने निवडणूक तारखा वगळून ठेवण्यात आले होते. त्यामुळे यंदाही लोकसभा निवडणूक आणि आयपीएल एकाचवेळी भारतात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.