टी-२०मध्ये ८०० षटकार ठोकणारा क्रिस गेल ठरलाय पहिला फलंदाज

आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध क्रिस गेलने टी-२०मध्ये ८०० षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम केलाय. असा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 9, 2017, 11:51 AM IST
टी-२०मध्ये ८०० षटकार ठोकणारा क्रिस गेल ठरलाय पहिला फलंदाज title=

नवी दिल्ली : आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध क्रिस गेलने टी-२०मध्ये ८०० षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम केलाय. असा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.

हा विक्रम करणारा गेल पहिला फलंदाज

वेस्ट इंडिजच्या या क्रिकेटरने बांगलादेश प्रीमियर लीगमधील ढाकामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात रंगपूर रायडर्सकडून खेळताना नाबाद १२६ धावांची खेळी केली. यातच त्याने हा विक्रम केलाय.  त्याने ५१ चेंडूत सहा चौकार आणि १४ षटकार ठोकले.

गेलच्या नावावर ३१८ टी-२० सामन्यात ८०१ षटकार

गेलच्या नावावर आतापर्यंत ३१८ टी-२० सामन्यात ८०१ षटकार ठोकलेत. यातील १०३ षटकार टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लगावलेत. टी-२०मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत गेलनंतर वेस्ट इंडिजचा किरेन पोलार्ड (५०६), न्यूझीलंडचा ब्रँडन मॅकक्युलम (४०८), वेस्ट इंडिजच्या ड्वायेन स्मिथ(३५१) आणि ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर (३१४) यांचा नंबर लागतो.

गेलने १२६ धावांसह टी-२०मध्ये १९वे शतकही पूर्ण केले. त्याच्या दमदार खेळीमुळे रायडर्सने एलिमिनेटर सामन्यात टाइटन्सला आठ विकेटनी हरवले.