चेन्नई : टी-२० स्पर्धेसाठी क्रिस गेल किती महत्त्वाचा आहे हे रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. चेन्नईसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने खेळलेल्या खेळीने दाखवून दिले की पंजाबचा त्याला खरेदी करण्याचा निर्णय किती योग्य होता. या स्पर्धेतील पहिल्या दोन बोलीनंतरही क्रिस गेलला कोणी विकत घेण्यास तयार नव्हते. मात्र तिसऱी बोली सुरु असताना प्रीती झिंटाने दोन कोटींच्या बेस प्राईसवर त्याला खरेदी केले.
रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास उतरलेल्या गेलने ३३ चेंडूत ६३ धावा ठोकल्या. त्याने लोकेश राहुलसह मिळून चेन्नईचे आक्रमण परतून लावले. राहुलने ३७ धावांची खेळी केली. मात्र गेलच्या खेळीने साऱ्यांची मने जिंकली. हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे वेगवान अर्धशतक आहे. याआधी त्याने १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
What a game the @lionsdenkxip have won by 4 runs with @henrygayle scoring 63 off 33 balls!!! #KXIPvCSK #IPL #CricketPlayedLouder pic.twitter.com/kU9xCVqgqP
— CPL T20 (@CPL) April 15, 2018
पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. ११व्या हंगामात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने आक्रमक खेळ करताना सात चौकार आणि चार षटकारांच्या सहाय्याने ६३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या धोनीच्या संघाला १९३ धावाच केल्या. चेन्नईला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.