Cheteshwar Pujara ची बॅट तळपली, बॅक टू बॅक ठोकली सेंच्युरी

काऊंटी क्रिकेटनंतर आता लंडन चषकात पुजाराची तुफान बॅटींग, ठोकल्या इतक्या धावा  

Updated: Aug 14, 2022, 09:37 PM IST
Cheteshwar Pujara ची बॅट तळपली, बॅक टू बॅक ठोकली सेंच्युरी  title=

इंग्लंड : टीम इंडियाचा टेस्ट चॅम्पियन चेतेश्वर पुजाराची रॉयल लंडन एकदिवसीय चषक स्पर्धेत चांगलीच बॅट चालतेय. त्याने बॅक टू बॅक सेंच्युरी ठोकली आहे. आजच्या सामन्यात तर त्याने 174 धावा ठोकल्या आहेत. त्याच्या या खेळीचे जोरदार चर्चा सुरु आहे.  

चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रॉयल लंडन वन डे चषकात चेतेश्वर पुजाराने  बॅक टू बॅक सेंच्युरी झळकावली आहे. या त्याच्या फलंदाजीने सरेच्या गोलंदाजांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी त्याने वॉरविकशायरविरुद्ध 73 चेंडूत शतक झळकावले होते.

सर्वोच्च धावसंख्या
पुजाराने 103 चेंडूत शतक पूर्ण केले होते, मात्र त्यानंतर तो आक्रमक फॉर्ममध्ये फलंदाजी करताना दिसला. पुढच्या 28 चेंडूत पुजाराने 74 धावा केल्या. पुजारा 131 चेंडूत 20 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 174 धावांची अप्रतिम खेळी खेळून बाद झाला. लिस्ट वन क्रिकेटमध्ये ससेक्सच्या कोणत्याही फलंदाजाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

या सामन्यात कर्णधार चेतेश्वर पुजाराशिवाय टॉम क्लार्कनेही शतक झळकावले आहे. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर सुस्केस संघाने निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 378 धावा केल्या आहेत.