चेन्नई : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईनं टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये धोनीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेमध्ये कोलकाता आणि चेन्नईनं प्रत्येकी एक मॅच खेळली आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीमचा विजय झाला आहे. त्यामुळे दोन्ही टीमकडे प्रत्येकी २ पॉईंट्स आहेत. आपला विजयी फॉर्म कायम ठेवण्याचं आव्हान दोन्ही टीमपुढे असणार आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नईनं कमबॅक केलं. यानंतर चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवरची ही पहिलीच मॅच आहे.
शेन वॉटसन, अंबती रायडू, सुरेश रैना, सॅम बिलिंग्स, एम.एस.धोनी, रवींद्र जडेजा, ड्वॅन ब्राव्हो, दीपक चहर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, शार्दुल ठाकूर
सुनिल नारायण, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, नितीश राणा, दिनेश कार्तिक, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, विनय कुमार, पियुष चावला, टॉम कुरन, कुलदीप यादव