कोहलीचे संकेत, भारतीय संघात होणार बदल

भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे आणि त्याने पुढच्या सामन्यांमध्ये प्लेईंग इलेवनमध्ये काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जे खेळाडू आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळले नाहीत त्यांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

Updated: Jul 2, 2017, 12:04 PM IST
कोहलीचे संकेत, भारतीय संघात होणार बदल title=

नॉर्थ साऊंड : भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे आणि त्याने पुढच्या सामन्यांमध्ये प्लेईंग इलेवनमध्ये काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जे खेळाडू आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळले नाहीत त्यांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

कोहलीने म्हटलं की, "आम्ही नक्कीच त्यात बदल करण्याचा विचार करु. आमच्याकडे काही खेळाडू आहेत ज्यांना अजून  खेळण्याची संधी नाही मिळाली. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून कोहली आनंदीत होता.

तो म्हणाला की, "आम्ही पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला काही कमी होती. नाणेफेक जिंकणं फायदेशीर ठरलं त्यांनी खरोखर चांगली गोलंदाजी केली. चांगल्या फलंदाजीमुळे आम्ही 250 धावा केल्या. कोहलीने सामन्यानंतर म्हटलं की, "दुस-या डावात विकेट चांगली होती. गोलंदाजांनी योग्य वेळी दबाव बनवला आणि विकेट्स घेतल्या.'