VIDEO : टीम इंडियाला मिळाला नवीन 'लेग स्पीनर'

टीम इंडियात एक नवीन लेग स्पीनर तयार होतोय... हा खेळाडू दुसरा-तिसरा कुणीही नसून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आहे.

Updated: Jun 6, 2017, 09:53 PM IST
VIDEO : टीम इंडियाला मिळाला नवीन 'लेग स्पीनर' title=

मुंबई : टीम इंडियात एक नवीन लेग स्पीनर तयार होतोय... हा खेळाडू दुसरा-तिसरा कुणीही नसून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आहे.

टीम इंडियात सध्या दोन घातक स्पीन बॉलर्स आहेत... रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा... या जोडीनं जगभरातल्या क्रिकेटर्सना घाम फोडलाय.... टेस्ट क्रिकेटमध्ये हे दोघेही आयसीसी रँकिंगमध्ये सर्वोच्च २ स्थानांवर आहेत. अशा वेळी एखाद्या खेळाडूला क्वचितच आपली जागा बनवता येईल... पण, अशी जादू करण्याची तयारी विराट सध्या करताना दिसतोय... आणि यासाठी तो चांगलीच मेहनतही घेतोय. 

नुकताच, बीसीसीआयनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर विराटच्या नेट प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये विराट नेटमध्ये एका खेळाडूला लेग स्पिन बॉलिंग करताना दिसतोय. विराटची ही अॅक्शन शेन वॉर्नशी मिळती - जुळती असताना दिसतेय.