IND vs NZ: कर्णधार अजिंक्य रहाणे या 11 खेळाडूंना घेऊन आज उतरणार मैदानात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.

Updated: Nov 25, 2021, 07:34 AM IST
IND vs NZ: कर्णधार अजिंक्य रहाणे या 11 खेळाडूंना घेऊन आज उतरणार मैदानात title=

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली. आता कसोटी मालिकेतही भारत किवी टीमला धूळ चारण्यासाठी उतरणार आहे.

सध्या विराट कोहली विश्रांतीवर असल्याने पहिल्या टेस्ट मॅचचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे देण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत विराट आणि अनेक दिग्गज खेळाडूंच्या विश्रांतीनंतर संघात अनेक बदल पाहायला मिळतील. आज न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत प्लेईंग इलेव्हेन कसं असणार आहे ते पाहूयात

गिल-अग्रवाल करणार ओपनिंग

मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्ध सलामीसाठी मैदानात उतरणार आहेत. हे दोन्ही फलंदाज भारताकडून न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ओपनिंग करतील. त्याचबरोबर रोहित शर्माला कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय केएल राहुल दुखापतीमुळे या मालिकेतून आधीच बाहेर गेला आहे.

मिडल ऑर्डरमध्ये या खेळाडूंना संधी

कसोटीतील महान फलंदाज चेतेश्वर पुजारा आधीच तिसऱ्या क्रमांकासाठी फिट आहे. चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत खुलासा खुद्द कर्णधार अजिंक्य रहाणेने केलाय. तर 5 नंबर अजिंक्य रहाणे फलंदाजीला येईल. 

पंतच्या अनुपस्थितीत साहा सांभाळणार धुरा

विकेटकीपर फलंदाज ऋद्धिमान साहा याची सहाव्या क्रमांकासाठी निवड होणार हे नक्की. ऋषभ पंतलाही कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी अष्टपैलू रवींद्र जडेजाला 7व्या क्रमांकावर संधी मिळण्याची खात्री आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल हे टीम इंडियाचे फिरकी गोलंदाज म्हणून खेळू शकतात. वेगवान गोलंदाजांसाठी या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांना स्थान दिलं जाऊ शकतं.

असं असेल प्लेईंग 11

  • शुभमन गिल
  • मयंक अग्रवाल
  • चेतेश्वर पुजारा
  • श्रेयस अय्यर
  • अजिंक्य रहाणे (कर्णधार)
  • ऋद्धिमान साहा (विकेटकीपर)
  • रवींद्र जडेजा
  • अक्षर पटेल
  • आर अश्विन
  • मोहम्मद सिराज
  • उमेश यादव