मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरची ओळख आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या खेळानं जगभरात एक वेगळं वलय तयार केलं आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. विरोधी टीममधील खेळाडूही सचिनचं कौतुक करत असतात. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट लीने त्या खुलासा केला आहे.
ब्रेट लीला सचिन तेंडुलकचं ऑटोग्राफ घ्यायचं होतं. त्यासाठी तो गेलाही होता मात्र मनात एक विचार आला आणि तो गेल्या पावली परत आला. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने सचिन तेंडुलकरला 14 वेळा आऊट केलं आहे.
सर्वात जास्त आऊट केल्यानंतरही ब्रेट लीला सचिनचा ऑटोग्राफ घेता आला नाही. 1999 मध्ये सिडनीमध्ये ब्रेटलीच्या डेब्यू मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने शतक ठोकलं होतं.
सचिन तेंडुलकरला बॉल टाकणं हे म्हणजे त्याचं एक स्वप्न सत्यात उतरलं. लीला नेहमी वाटायचं सचिन तेंडुलकरकडून एक ऑटोग्राफ घ्यावं पण त्याने ते केलं नाही. सचिन तेंडुलकर जेव्हा गोलंदाजी करायला आला तेव्हा मला असं वाटलं की महान फलंदाजासमोर मी बॉलिंग करतोय.
'सचिन तेंडुलकरला आऊट करण्यात ब्रेट ली यशस्वी ठरला. तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा होता. मी लहानपणापासून सचिन तेंडुलकरला खेळताना पाहिलं. त्याला खेळताना पाहताना मोठा झालो आहे.'
'बॉलिंग करताना तो समोर आला की प्रश्नच पडतो त्याला कसं आऊट करू. मी त्याला आऊट करण्यात यशस्वी झालो. प्रत्येक मॅचनंतर त्याला शेक हॅण्ड केलं. त्याचा प्रभाव एवढा होता की त्याने मी भारावून जात होतो.'