Tokyo Olympics : खांद्याची दुखापतीत बॉक्सर विकास कृष्ण यादव रिंगणात उतरला, आणि...

भारताचा अनुभवी बॉक्सर विकास कृष्ण यादव ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. 

Updated: Jul 25, 2021, 10:14 AM IST
 Tokyo Olympics : खांद्याची दुखापतीत बॉक्सर विकास कृष्ण यादव रिंगणात उतरला, आणि... title=

मुंबई : Tokyo Olympicsला सुरुवात झाली असून भारताकडून मीराबाई चानूने एका पदकाला गवसणी घातली आहे. मात्र Tokyo Olympicsमध्ये भारताला एक मोठा झटकाही लागला आहे. भारताचा अनुभवी बॉक्सर विकास कृष्ण यादव ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. बॉक्सिंगमध्ये 69 किलोग्रॅमच्या राऊंडच्या 32मध्ये जपानच्या सेवोनरेट्स क्विंकी मेनसाह ओकाजावाने 5-0 ने पराभव केला. 

दरम्यान या संपूर्ण मॅचमध्ये जपानच्या ओकाजावाचं वर्चस्व दिसून आलं. हा सामना एकतर्फा झालेला पहायला मिळाला. या सामन्यादरम्यान पाचंही परिक्षकांनी जपानच्या बॉक्सरला 10 पॉईंट्स दिले. तर विकासला 9 पॉईंट्स देण्यात आले. ज्यामुळे विकास पिछाडीवर गेला आणि सामन्यात त्याला हार पत्करावी लागली.

ओकाजावाविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात विकास अस्वस्थ दिसत होता. पहिली, दुसरी, तिसरी आणि अंतिम फेरीवर येऊनही विकासाची परिस्थिती बदलेली दिसली नाही. दरम्यान या सामन्यात त्याच्या डाव्या डोळ्याखाली दुखापतही झाली. इतकंच नाही तर अशी चर्चा होती की तो खेळायला उतरला तेव्हा तो खांद्याच्या दुखापतीसोबत उतरला होता. 

ज्यावेळी तो खेळायला उतरला त्यावेळी त्याने कोणतीही अडचणीविना सुरुवात केली. पण जेव्हा ओकाजावाने त्याच्या पद्धतीने खेळण्यास सुरुवात केली त्यावेळी विकासच्या खांद्यावर पुन्हा दुखापत झाली. खेळादरम्यान विकास त्याचा डावा हात योग्यरित्या वापरण्यासही सक्षम नव्हता. ज्यामुळे तो संपूर्ण सामन्यात फक्त एका हाताने बॉक्सिंग करताना दिसला.

25 वर्षीय ओकाजाने 2019 च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल जिंकलं आहे. 2019 मध्ये तो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. दरम्यान विकासला पराभूत केल्यानंतर, ओकाजावाचा क्युबाच्या रोनिएल इगलेसियसशी होईल. इगलेसियसने 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तो माजी विश्वविजेताही आहे.