Paris Olympics 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील महिला कुस्ती 50 किलो स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. विनेशने आत्तापर्यंत एकही मॅच न हारलेल्या गतविजेती युई सुसाकीचा पराभव केला. तर क्वार्टर फायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना लिवाच हिला धोबीपछाड दिला. विनेशच्या या कामगिरीचं सध्या जोरदार कौतूक होतंय. दोन तासात विनेशने सुवर्ण पदकाच्या दिशेने झेप घेतली आहे. अशातच विनेश अशातच कुस्तीपटू बजरंग पुनियाची पोस्ट व्हायरल होत आहे.
विनेश फोगाट भारताची ती वाघिण आहे जिने आज बॅक टू बॅक सामन्यात 4 वेळची वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवलं. क्वार्टर फायनल सामन्यात माजी वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला हरवलं. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती असावी, की याच मुलीला देशात लाथांनी मारहाण झाली होती अन् रस्त्यावर तिला देशात रस्त्यावर ओढलं गेलं होतं. ही मुलगी जग जिंकणार आहे पण या देशातील व्यवस्थेने तिचा पराभव केला, अशी पोस्ट बजरंग पुनिया याने केली आहे.
विनेशच्या विजयावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजत नाहीये. प्रथमच, आपण आनंदी आहोत की रडत आहोत हे समजत नाही. संपूर्ण भारताला या पदकाची प्रतीक्षा आहे. सर्वांचे डोळे ओले आहेत. जणू काही विनेश एकटी नसून संपूर्ण देशातील सर्व महिला लढत आहेत. विनेश, तुझा जन्म खऱ्या अर्थाने विक्रम करण्यासाठी झाला आहे. इतक्या अडचणींचा सामना करूनही तुमची नजर ध्येयाकडे वळलेली असते. हे गोल्ड भारताकडे यावं हीच आमची प्रार्थना आहे, असंही बजरंग पुनिया म्हणाला आहे.
विनेश फोगाट भारत की वो शेरनी जिसने आज बैक टू बैक मैच में
4 बार की World Champion और मौजूदा ओलंपिक चैंपियन को हराया
उसके बाद क्वार्टरफाइनल में पूर्व World Champion को हराया
मगर एक बात बताऊं,
ये लड़की अपने देश में लातों से कुचली गई थी
ये लड़की अपने देश में सड़कों पर घसीटी गई…— Bajrang Punia (@BajrangPunia) August 6, 2024
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाप्रकरणी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचा छळ केला, असा आरोप त्यांच्यावर कुस्तीपटूंनी केला होता. तसेच जंतर मंतरवर महिला कुस्तीपटू आणि पुरूष कुस्तीपटूंनी आंदोलन देखील केलं होतं. यामध्ये विनेश फोगाटने देखील सहभाग नोंदवला होता. विनेश फोगाटच्या डोळ्यातील अश्रू अजूनही अनेकांना आठवत असतील. पण विनेश थांबली नाही तिने पुन्हा तयारी सुरू केली अन् ऑलिम्पिकमध्ये बाजी मारली.
दरम्यान, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकनंतर विनेशवर बंदी घालण्यात आली होती. बृजभूषण शरण सिंह यांनी विनेशला टार्गेट करत 'आम्ही खोटा सिक्का पाठवला होता', अशी टीका केली होती. त्यानंतर विनेश फोगाट डिप्रेशनमध्ये गेली. डॉक्टरांनी तिला कुस्ती थांबवण्याचं आवाहन देखील केलं होतं. पण विनेश थांबली नाही. एकीकडे रस्त्यावर कुस्तीपटूंसाठी उभी असताना विनेशने सराव करत होती. कुटुंबाने तिला प्रेरित केलं आणि तिला नेहमीच पाठिंबा दिला. कुटुंबाच्या पाठिंब्याने विनेश बरी झाली. कुस्तीमध्ये परतली आणि राष्ट्रकुलमध्ये गोल्ड जिंकलं. त्यानंतर आता विनेशने सर्व आव्हान पार करत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली होती.