ऑस्ट्रेलियाचे खेळाडू IPL 2021चे उर्वरित सामने खेळणार? ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डकडून खुलासा

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू महिन्याभरानंतर आपल्या घरी पोहोचले आहेत. 4 मे रोजी आयपीएल स्थगित झाल्यानंतर खेळाडूंना थेट आपल्या घरी जाण्याची परवानगी नव्हती.

Updated: Jun 2, 2021, 12:45 PM IST
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू IPL 2021चे उर्वरित सामने खेळणार? ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डकडून खुलासा title=

मुंबई: IPL 2021चे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. या सामन्यांसाठी भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं इंग्लंड बोर्डनं स्पष्टीकरण दिलं. आता या कालावधीमध्ये विदेशी खेळाडू IPLसाठी कसे येणार याबाबद देखील प्रश्नचिन्ह आहेच. याचं कारण म्हणजे प्रत्येक देशाचे दौरे ठरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता IPL 2021चे सामने कसे पार पडणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

नुकतेच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू महिन्याभरानंतर आपल्या घरी पोहोचले आहेत. 4 मे रोजी आयपीएल स्थगित झाल्यानंतर खेळाडूंना थेट आपल्या घरी जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांना मालदीवमध्ये क्वारंटाइन आणि त्यानंतर सिडनीमध्ये 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यानंतर सर्व स्टाफ आणि खेळाडू आपल्या घरी परतले आहे. 

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी अद्याप IPL 2021च्या उर्वरित सामन्यांची कोणतीही चर्चा केल्याची माहिती मिळाली नाही. नुकतेच सर्व खेळाडू घरी पोहोचले आहेत. याशिवाय वेस्ट इंडिज दौऱ्याची तयारी करण्याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतर IPLबाबत निर्णय अधिक स्पष्ट होऊ शकेल अशीही माहिती मिळाली आहे. 

IPL 2021उर्वरित 31 सामने सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान UAEमध्ये होणार आहेत. या दरम्यान सामने कधी होणार आणि शेड्युल कसं असेल याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.