मुंबई: सचिन तेंडुलकर आपल्या फलंदाजीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही खेळाडू सचिनला भेटण्यासाठी त्याच्या मार्गदर्शनासाठी वाट पाहात असतात. सचिनला भेटण्यासाठी विदेशी खेळाडूनं लाईव्ह मुलाखत अर्धवट सोडल्याचा किस्सा देखील आहेच. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूनं सचिन तेंडुलकरची ड्रेसिंग रूममध्ये येऊन माफी मागितली होती.
2008 रोजी भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सामने झाले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघाचे सामने रोमांचक असतील अशी चर्चा त्यावेळी होती. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला एका सामन्यात 158 धावांवर ऑलआऊट केलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चिडले आणि त्यांनी स्लेजिंग करण्यास सुरुवात केली.
भारतीय संघाची फलंदाजी होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर क्रिझवर गेले. बॉलिंगसाठी ब्रेटली आला. सचिन तेंडुलकरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याने स्लेजिंग सुरू केलं. अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या खेळाडूंना उसकवण्याचे चिडवण्याचे डिवचण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र भारतीय संघाने तो सामना मोठ्या धौर्याने जिंकला.
सामना संपल्यानंतर ब्रेटलीला आपल्या केलेल्या कृतीबद्दल पश्चाताप झाला आणि त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सचिन तेंडुलकरची माफी मागितली होती.