Athiya Shetty-KL Rahul लग्नासाठी सजला मंडप, पण सात फेऱ्यांपूर्वी घेतला मोठा निर्णय

Athiya Shetty-KL Rahul Wedding : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल यांचा लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच या दोघांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jan 22, 2023, 10:43 AM IST
Athiya Shetty-KL Rahul लग्नासाठी सजला मंडप, पण सात फेऱ्यांपूर्वी घेतला मोठा निर्णय title=
athiya shetty kl rahul wedding no phone policy like alia ranbir marriage and first look of mandap video grand reception in mumbai marathi news

Athiya Shetty and KL Rahul Marriage Trending Video : अभिनेत्री अथिया शेट्टी  (Athiya Shetty) आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल (KL Rahul Wedding)  सोमवारी 23 जानेवारी 2023 म्हणजे उद्या (Athiya Shetty and KL Rahul Wedding Date) विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईजवळील खंडाळामधील बंगाल्यावर हा विवाह सोहळा होणार आहे. अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty Daughter) लाडक्या लेकीच्या लग्नासाठी जोरदार तयारी करत आहेत. लग्नाचा मंडप सजला आहे, सनईचे सूर वाजत आहेत...सगळीकडे रोषणाई...अशात अथिया (Athiya Shetty Wedding) आणि राहुलने मोठ्या निर्णय घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.  

काय घेतला निर्णय 

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट  (Alia-Ranbir Wedding)  यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही लग्नात नो फोन पॉलिसीचा (Athiya Shetty Photos) निर्णय घेतला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर प्रमाणेच अथिया-केएल राहुलच्या (Athiya-KL Rahul) लग्नातही फोन वापरण्यावर बंदी असेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

वऱ्हाडांना फोटो क्लिक करता येणार नाही!

रिपोर्ट्सनुसार, या लग्नाचं ज्यांना आमंत्रण आहे त्या वऱ्हांडाना (Alia Bhatt-Ranbir Kapoor Marriage Photos) विवाहस्थळी पोहोचल्यानंतर आपल्या फोन जमा करायचा आहे. याशिवाय अतिथींना फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तर लग्नात पापाराझींसाठीही (Paparazzi) वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. (athiya shetty kl rahul wedding no phone policy like alia ranbir marriage and first look of mandap video grand reception in mumbai marathi news) 

मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित करणार?

लग्नासाठी खूप जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नात (Athiya-KL Rahul Wedding Guest List) विराट कोहली (Virat Kohli), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांना आमंत्रित देण्यात आलं आहे. एका खाजगी वृत्तानुसार, हे जोडपे मुंबई आणि बंगळुरूमधील त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांसाठी मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यानंतर काही आठवड्यांनी रिसेप्शन होणार आहे. शिवाय आयपीएलनंतर अथिया-केएल राहुल मित्रांसाठी एक मोठी पार्टीही ठेवणार आहेत.