नवी दिल्ली : जकार्तामध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत चौथ्या दिवशी भारताने आतापर्यंत 5 मेडल नक्की केले आहेत. टेनिसच्या महिला एकेरीमध्ये भारताच्या अंकिता रैनाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. तिने हाँगकाँगमध्ये इउडिस वाँग चाँगचा 6-4, 6-1 ने पराभव करत सेमीफायनलमध्ये आपली जागा नक्की केली आहे. भारताने मंगळवारी 4 पदक नक्की केले होते.
4 मेडल निश्चित
बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता वुशूचे सामने होणार आहे. ज्यामध्ये भारताला मेडल मिळू शकतं. रोशिबिना देवी (महिला 60 किलो), संतोष कुमार (पुरुष 56 किलो), सूर्य भानु प्रताप सिंह (पुरुष 60 किलो) आणि नरेंद्र ग्रेवाल (पुरुष 65 किलो) वजनी गटात आज सेमीफायनलचे सामने खेळणार आहेत. या सगळ्या खेळाडूंनी सेमीफायनलमध्ये पोहोचत मेडल पक्क केलं आहे.
भारत 7 व्या स्थानी
आशियाई स्पर्धेच्या 3 दिवसांमध्ये भारताने 10 मेडल मिळवले आहेत. ज्यामध्ये 3 गोल्ड, 3 सिल्वर मेडलचा समावेश आहे. सर्वाधिक मेडल मिळवणाऱ्यांच्या यादीत भारत सध्या सातव्या स्थानावर आहे.
आशियाई स्पर्धा 2018: टेनिसपटू अंकिता रैनाची सेमीफायनलमध्ये धडक