Asia Cup 2023: एशिया कपमध्ये नवं वळण; भारत-पाकसह सर्व सामने 'या' ठिकाणी होणार!

Asia Cup 2023, Super-4 Venue: मंगळवारी एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यानंतर सुपर-4 चं गणित स्पष्ट झालं आहे. ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) तर ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश यांनी पुढची फेरी गाठली आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 6, 2023, 08:36 AM IST
Asia Cup 2023: एशिया कपमध्ये नवं वळण; भारत-पाकसह सर्व सामने 'या' ठिकाणी होणार! title=

Asia Cup 2023, Super-4 Venue: मंगळवारी एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यानंतर सुपर-4 चं गणित स्पष्ट झालं आहे. ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) तर ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश यांनी पुढची फेरी गाठली आहे. अशातच आता मंगळवारी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ने एशिया कपचे स्पर्धेचे सुपर 4 टप्प्याचे सामने आणि अंतिम सामने कोलंबोमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. याच कारण म्हणजे श्रीलंकेच्या राजधानीत हवामान चांगले होण्याची चिन्हं आहेत.

कोलंबोमध्ये मुसळधार पावसानंतर सुपर 4 चे सामने आणि अंतिम सामना हंबनटोटामध्ये हलवला जाण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) श्रीलंका क्रिकेट काऊंसिल (SLC), यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि अधिकृत प्रसारक यांच्याशी चर्चा करून सर्व सामने कोलंबोमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय.

भारत आणि पाकिस्तानचा सामना आता 'या' मैदानावर रंगणार

श्रीलंका क्रिकेट काऊंसिलने आशिया कपच्या सुपर फोरसाठी पाच सामने आणि अंतिम सामन्यासाठी पर्यायी ठिकाण म्हणून हंबनटोटाच्या नावाचा पर्याय दिला होता. येत्या 10 सप्टेंबर रोजी आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील सामन्याने सुपर फोरच्या श्रीलंकेच्या लेगची सुरुवात होणार आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानशी ( India vs Pakistan ) सामना होण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, आयोजक सामना कोलंबोमध्ये आयोजित करण्याची शक्यता तपासत आहेत. 

एशियन क्रिकेट काऊंसिलने सर्व सामने पल्लेकेले किंवा डंबुलामध्ये हलवण्याच्या सूचनेवर विचार केला. परंतु नंतर तसं न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पल्लेकेलेमध्येही मुसळधार पाऊस पडतोय तर डांबुलाच्या रंगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये नूतनीकरणाचं काम सुरूये. 

ग्रुप स्टेजमधील भारताच्या दोन्ही गटातील सामन्यांना पावसाचा फटका बसला आहे. कँडीमधील पल्लेकेले स्टेडियमवर शनिवारी भारताचा पाकिस्तानविरुद्धचा ( India vs Pakistan ) सामना मुसळधार पावसामुळे एका डावात रोखला गेला. तर सोमवारी भारताचा नेपाळविरुद्धचा सामनाही पावसामुळे खोळंबला.