...तरीही टीम इंडियाला परफेक्ट ओपनिंग जोडी मिळेना, कॅप्टन रोहितसाठी मोठी डोकेदुखी

Asia Cup 2022 :  तब्बल 7 ओपनर्सना संधी, तरीही परफेक्ट प्लेअर मिळेना, कॅप्टन रोहितसोबत ओपनिंग कोण करणार?

Updated: Aug 5, 2022, 09:06 PM IST
...तरीही टीम इंडियाला परफेक्ट ओपनिंग जोडी मिळेना, कॅप्टन रोहितसाठी मोठी डोकेदुखी title=

मुंबई : वेस्ट इंडीज विरुद्धची 5 टी 20 सामन्यांची सीरिज रविवारी संपणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला 27 ऑगस्टपासून आशिया कपसाठी खेळायचं आहे. कॅप्टन रोहित शर्मासमोरची डोकेदुखी वाढतच आहे. याचं कारण म्हणजे अजूनही टीम इंडियाला ओपनिंग जोडी मिळाली नाही. 

आतापर्यंत कॅप्टन रोहित शर्मासोबत वेगवेगळे खेळाडू ओपनिंगसाठी उतरवून झाले. मात्र नेमकी कोणती जोडी पक्की करायची याचं गणित काही अजूनतरी बसलेलं नाही. त्यामुळे आशिया कपसाठी ओपनिंगला कोण उतरणार याची उत्सुकता वाढत आहे. 

वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यात टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. आशिया कपसाठी टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीची अडचण अजूनही सुटली नाही. ते मोठं आव्हान रोहित शर्मासमोर आहे. 

यंदा टीम इंडियाने सात वेगवेगळ्या ओपनिंग जोड्या आजमावल्या आहेत. सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत रोहित आणि सूर्यकुमार यादवने ओपनिंगसाठी उतरत आहे. 

के एल राहुल दुखापतीमुळे चिंतेचा विशय आहे. त्यामुळे तो ओपनिंगला उतरेल की नाही याची शक्यता कमी आहे. तो खेळणार की नाही यावरही शंका आहे. त्यामुळे विराट कोहली आशिया कपमध्ये ओपनिंगसाठी उतरण्याची शक्यता आहे असा दावा पार्थिक पटेलनं केला आहे. 

रोहितने ओपनिंगसाठी ईशान किशन, ऋषभ पंत, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव या खेळाडूंना आजमावून पाहिलं आहे. ऋतुराज गायकवाड-ईशान किशन,  दीपक हुड्डा-ईशान किशन ही जोडी देखील ओपनिंगला उतरवून पाहिली आहे. 

आता रंजक गोष्ट ही आहे की यापैकी नक्की रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार आहे. टीम इंडियासमोरचा हा पेच कॅप्टन रोहित कसा सोडवणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.