मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि भारताचा युवा बॅट्समॅन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉचा हा फोटो २०११ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्या दरम्यानचा आहे.
वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध श्रीलंका अशा अंतिम सामन्यात अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ हजर होते आणि सामना पाहण्यात दंग होते. तेव्हाचा काढलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ एकत्र बसून वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा आनंद घेत होते.
मॅच दरम्यान अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सची टोपी घातली होती. त्यात मजेशीर गोष्ट ही आहे की, अर्जुनने ज्या आयपीएल टीमची जर्सी त्यावेळी घातली होती त्याच टीम मध्ये म्हणजे मुंबई इंडियन्सने त्याला 10 वर्षानंतर 20 लाखांमध्ये विकत घेतले आहे.
मुंबई इंडियन्समध्ये काही वर्षांपर्यतर सचिन तेंडुलकर देखील खेळत होता नंतर त्याने रीटार्यमेन्ट घेतली होती. आता आयपीएल 2021 सीरिजमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये अर्जुन तेंडुलकर खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आता सचिन तेंडुलकर सारखंच प्रेम क्रिकेट प्रेमी अर्जुन तेंडुलकरला देणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबई २०११ च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला 6 विकेट्सने पराभूत केले आणि दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. भारत 28 वर्षांनंतर विश्वविजेतेपदावर आला आणि अंतिम सामन्यात धोनी सामनावीर ठरला.