अँडी मरे विम्बल्डनमधून बाहेर

विम्बल्डनमधून दिग्गजांची एक्झिट सुरुच आहे.

Updated: Jul 12, 2017, 11:14 PM IST
अँडी मरे विम्बल्डनमधून बाहेर  title=

लंडन : विम्बल्डनमधून दिग्गजांची एक्झिट सुरुच आहे. गतविजेता आणि वर्ल्ड नंबर वन अँडी मरेला विम्बल्डनमध्ये पराभवाचा धक्का बसलाय. 24व्या मानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीनं मरेवर सनसनाटी विजय मिळवलाय.

3-6, 6-4, 6-7, (4-7), 6-1, 6-1, अशा सेटमध्ये क्वेरीनं मरेवर विजय मिळवला. 2009साली अँडी रॉडिकनंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या टेनिसस्टारनं विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. दुसरीकडे या पराभवामुळे अँडी मरेच्या रँकिंगवर परिणाम होणार असून नोवाक ज्योकोविच त्याचं स्थान घेण्याची शक्यता आहे.