मुंबई : टीम इंडियाचा मधल्या फळीतील अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याबाबतची माहिती त्याने बीसीसीआयला लेखी पत्र दिले आहे. सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये संधी न मिळाल्याने अंबाती रायुडू नाराज असल्याने त्याने निवृत्ती घेतल्याचे समजत आहे. टीम इंडियाच्या अंतिम-15 मध्ये त्याला संधी मिळाली नाही.
Indian middle-order batsman Ambati Rayudu has announced his retirement from all forms of cricket, he has written to BCCI pic.twitter.com/v4Wf3fwZ5i
— ANI (@ANI) July 3, 2019
रायुडूने भारतासाठी 55 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 47.05 च्या रनरेटने 1694 रन केले आहेत. रायुडूने 3 शतक आणि 10 अर्द्धशतक देखील ठोकले आहेत. रायुडूने भारतासाठी आतापर्यंत 6 टी-20 सामने खेऴले आहेत. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सगळेच क्रिकेट प्रेमी हैराण आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी रायुडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. एकदिवसीय आणि टी-२० वर अधिकाअधिक वेळ देण्यासाठी ही निवृत्ती घेतल्याचे तो म्हणाला होता. पण आता क्रिकेटमधूनच त्याने निवृत्तीची घोषणा सगळ्यांना थक्क करणारी आहे.