Ambati Rayudu Announcement : टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल जिंकून देणाऱ्या अंबाती रायडू (Ambati Rayudu) आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. क्रिकेटच्या मैदानाला रामराम ठोकल्यानंतर अंबाती रायडू राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, आता अंबाती रायडू राजकीय मैदानात देखील आऊट झाल्याचं पहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच वायएसआर काँग्रेसमध्ये (YSRCP Party) प्रवेश केलेल्या रायडूने आता राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला (Ambati Rayudu leave politics) आहे. एक्सवर पोस्ट करत रायडूने याची माहिती दिली.
काय म्हणाला Ambati Rayudu ?
सर्वांना कळवायचं आहे की, मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील माहिती योग्य वेळी कळविण्यात येईल, असं अंबाती रायडूने ट्विट करत म्हटलं आहे.
This is to inform everyone that I have decided to quit the YSRCP Party and stay out of politics for a little while. Further action will be conveyed in due course of time.
Thank You.
— ATR (@RayuduAmbati) January 6, 2024
काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 28 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत अंबाती रायडू याने पक्षप्रवेश केला होता. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी उपस्थित होते. मात्र, आता रायडूने राजकारणातून लांब राहण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. अंबाती रायडूने असा निर्णय का घेतला? असा सवाल आता विचारला जात आहे.
दरम्यान, अंबाती रायडू याने काही दिवसांपूर्वी त्याच्या मूळ जिल्ह्यातील गुंटूरचा दौरा केला होता. त्यावेळी त्याने स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी त्याने आपण लवकरच राजकारणात (Ambati Rayudu In Politics) येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे अंबाती रायडूला खासदारकी मिळणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता रायडूने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.