मेलबर्न : अखेर सर्व क्रिकेटप्रेमींना हवा असलेला सामना मैदानावर रंगला आणि यामध्ये भारताने बाजी मारली. हार्दिक पंड्या आणि विराट कोहली या विजयाचे शिल्पकार ठरले. मात्र अक्षर पटेलने लोकांना एक धक्का दिला. हा धक्का होता तो म्हणजे 5 व्या क्रमांकारवर फलंदाजी करण्याचा. या क्रमांकारवर येऊन अक्षक मोठी खेळी खेळणार तेव्हाच तो नेमका रनआऊटचा शिकार झाला. मात्र पटेल ज्या पद्धतीने रनआऊट झाला त्यावरूनही वादंग माजलाय.
ही संपूर्ण घटना भारताच्या रन्सच्या 7 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर घडली. बॉल खेळल्यावर अक्षर पटेलने सिंगलसाठी कॉल दिला मात्र. नॉन स्ट्रायकरला उभा असलेला विराट कोहलीने रन घेण्यास नकार दिला. यावेळी त्याने अक्षर पटेलला माघारी पाठवलं. यादरम्यान बाबर आझमकडून बॉल निसटला.
त्याचवेळी पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानचाही गोंधळ उडाला. क्षणाचा फायदा घेत मोहम्मद रिझवानने तातडीने बेल्स उडवले. त्याच क्षणी अक्षर पटेलने डायव्ह मारत तो कसाबसा क्रीजवर पोहोचला. मात्र, मोहम्मद रिझवानच्या रिएक्शनवरून चूक त्याच्याकडून झाल्याचं समजलं .
— Bleh (@rishabh2209420) October 23, 2022
दरम्यान ऑनफिल्ड अंपायरने तिसर्या अंपायरला निकाल देण्यास सांगितले. मात्र थर्ड अंपायर रिचर्ड कॅटलबोरा यांनी दिलेल्या निर्णयामुळे भारतीय फॅन्स नाराज झाले. मोहम्मद रिझवानने हातात बॉल येण्यापूर्वीच बेल्स उडवले असल्याचं दिसलं. पण, तिसऱ्या अंपायरने पाकिस्तानच्या बाजूने निकाल देत अक्षर पटेलला आऊट करार दिला.