IPL 2024: निराशाजनक सुरुवातीनंतर आता...; RCB च्या प्लेऑफ एन्ट्रीनंतर विजय माल्याचं टीमसाठी खास ट्विट

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर टीचे चाहते फार खुश आहे. अशातच टीमे माजी मालक विजय मल्ल्या देखील आनंदात असल्याचं समोर आलं. 

सुरभि जगदीश | Updated: May 20, 2024, 08:06 AM IST
IPL 2024: निराशाजनक सुरुवातीनंतर आता...; RCB च्या प्लेऑफ एन्ट्रीनंतर विजय माल्याचं टीमसाठी खास ट्विट title=

IPL 2024: शनिवारी रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवत थेट प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. लीग स्टेजच्या या सामन्यात आरसीबीला 18 किमान रन्सने विजय मिळवणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीत आरसीबीने चेन्नईवर 27 रन्सने विजय मिळवला. यामुळे चेन्नईला मागे सारत आरसीबीने रनरेटच्या जोरावर पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या चारमध्ये स्थान पटकावलं. टीमची ही कामगिरी पाहता माजी मालक विजय माल्या यांनी कौतुक केलं आहे. 

विजय माल्याने दिल्या शुभेच्छा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर टीचे चाहते फार खुश आहे. अशातच टीमे माजी मालक विजय मल्ल्या देखील आनंदात असल्याचं समोर आलं. विजय माल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करत टीमचं कौतुक केलं आहे. विजय माल्या म्हणतो, 'टॉप फोरमध्ये पात्र ठरल्याबद्दल आणि आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचल्याबद्दल आरसीबीचे हार्दिक अभिनंदन. तुमची मेहनत आणि कठोर परिश्रमाने तुम्ही निराशाजनक सुरुवातीनंतर आता चांगली सुरुवात केली आहे. तसंच यावेळी ट्रॉफीकडे तुमचं पाऊल पुढे टाकले आहे.

माल्या पळून परदेशी गेलाय

उद्योगपती विजय मल्ल्या याने 2008 मध्ये आरसीबी फ्रँचायझी विकत घेतली होती. 2013 पासून मल्ल्या याच्या व्यवसायातील अडचणी वाढू लागल्या. यानंतर 2016 मध्ये विजय मल्ल्या याने आरसीबीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला. विजय मल्ल्या याच्यावर सुमारे 9900 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. तो बराच काळ परदेशात असून त्याला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. न्यायालयानेही मल्ल्याला फरार घोषित केलंय.

यंदाच्या वर्षी आरसीबी जिंकणार का पहिल्यांदा ट्रॉफी

आरसीबीच्या पुरुषांच्या टीमने आतापर्यंत एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकली नाही. लीग स्टेजमध्ये एक वेळ अशी होती, जेव्हा आरसीबीला प्लेऑफ गाठणं शक्य नाही असं दिसत होतं. मात्र अखेरीस सलग 5 सामने जिंकून आरसीबीने यंदाच्या प्लेऑफमध्ये मजल मारलीये. सध्या आरसीबीची टीम चौथ्या स्थानवर असून त्यांना एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार आहे. त्यामध्ये विजय मिळाल्यानंतर क्वालिफायर खेळावी लागणार आहे. यामध्ये आरसीबीला विजय मिळाल्यास त्यांना फायनलमध्ये स्थान मिळणार आहे.