एबी डे विलियर्सने खास अंदाजात दिल्या कोहलीला शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतो. क्रिकेटपासून बॉलीवूड जगतापर्यंत सर्वच जण विरुष्काला शुभेच्छा देतायत.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 15, 2017, 05:08 PM IST
एबी डे विलियर्सने खास अंदाजात दिल्या कोहलीला शुभेच्छा title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतो. क्रिकेटपासून बॉलीवूड जगतापर्यंत सर्वच जण विरुष्काला शुभेच्छा देतायत.

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डे विलियर्सनेही एकदम हटके अंदाजात कोहलीला शुभेच्छा दिल्यात. डे विलियर्सने एक व्हिडीओ पोस्ट केलाय यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने आपल्या सहकारी खेळाडूला शुभेच्छा दिल्यात. याशिवाय त्याने कोहलीची मस्करीही केली.

तो म्हणाला, विराट कोहली आणि अनुष्का शर्माला लग्नाच्या शुभेच्छा. अचानक झालेल्या लग्नामुळे सगळेच हैराण झाले मात्र मला माहीत होतेच तुम्ही लोक अशा प्रकारचे सरप्राईज देऊ शकता. लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही दोघे नेहमी एकत्र राहा आणि तुम्हाला खूप सारी मुले होवोत. 

चार वर्षे रिलेशनशिमध्ये राहिल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काचा इटलीमधील बोर्गो फिनोशिएटो मध्ये हा सोहळा पार पडला.

या दोघांच्या लग्नाबाबत मोठा सस्पेंस होता. सोमवारी ११ डिसेंबरला रात्री ९ वाजता अनुष्का आणि विराटने आपल्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि हा सस्पेंस संपवला.