महिला धावपटूने मोडला उसेन बोल्टचा विक्रम

ती एका दहा महिन्यांच्या बाळाची आईसुद्धा आहे 

Updated: Oct 3, 2019, 12:21 PM IST
महिला धावपटूने मोडला उसेन बोल्टचा विक्रम  title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : अमेरिकेची धावपटू, ३२ वर्षीय ऍलिसन फेलिक्स हिने IAAF World Championship या स्पर्धेतील मिश्र रिले रेसमध्ये सहभाग घेतला होता. ज्यामध्ये तिने आपल्या चमूला सुवर्णपदकापर्यंत पोहोचवलं, शिवाय वैयक्तिक विक्रमही मोडला. 

फेलिक्सच्या अफलातून कामगिरीने तिच्या पूर्ण टीमलाच स्पर्धेचं जेतेपद मिळवून दिलं नाही, तर स्वत:चं १२वं सुवर्णपदकही मिळवून दिलं. जवळपास १० महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिल्यानंतर सध्याच्या घडीला तिच्या या कामगिरीचं फक्त क्रीडा वर्तुळातूनच नव्हे, तर सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

मोडला उसेन बोल्टचा विक्रम

यापूर्वी उसेन बोल्ट या सर्वाधिक वेगवान धावपटूकडे वर्ल्ड चँपियनसिपध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं कमावण्याचा विक्रम होता. त्याने आकापर्यंत ११ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्याच्या याच विक्रमाला मागे टाकत फेलिक्सने महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रवर्गांमध्ये एकूण १२ सुवर्णपदकांची कमाई करत त्याला मागे टाकलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Allyson Felix (@af85) on

'सीबीएस'च्या वृत्तानुसार तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीमधील विविध शर्यतींमध्ये एकूण २५ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. ज्यामध्ये उल्लेख करायचा झाल्यास, २००९, २०१२ आणि २०१६ मधील ऑलिम्पिक खेळांचाही समावेश आहे. २०१७ IAAF World Championship पासून तिने एकही सुवर्णपदक कमावलं नव्हतं. पण, एका वर्षाच्या अंतरानंतर या क्षेत्रात परतूनही तिने पुन्हा एकदा सर्वच प्रतिस्पर्धींना तगडं आव्हान दिलं असं म्हणायला हरकत नाही.