Surya Grahan: 2022 वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण या दिवशी, जाणून घ्या कसा प्रभाव पडेल

सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे.

Updated: Aug 29, 2022, 07:10 PM IST
Surya Grahan: 2022 वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण या दिवशी, जाणून घ्या कसा प्रभाव पडेल title=

Surya Grahan 2022: सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ग्रहणाकडे वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात, तेव्हा सूर्यग्रहण होतं. यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर पोहोचत नाहीत. या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी लक्ष्मीपूजन आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या काळात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजेसारखे कोणतेही महत्त्वाचे काम केले जात नाही. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.29 ते 05.24 पर्यंत सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतातून दिसणार नसल्याने सुतक मान्य नाही त्यामुळे दिवाळीला होणाऱ्या लक्ष्मीपूजनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

सूर्यग्रहण
तारीख: 25 ऑक्टोबर, शनिवार
वेळ: संध्याकाळी 4.29ते संध्याकाळी 5.24 पर्यंत
ग्रहण कसे असेल: खंडग्रास ग्रहण
कुठे दिसेल: युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका आणि अटलांटिक

2022 सालातील पहिले सूर्यग्रहण शनिवारी 30 एप्रिल 2022 रोजी झालं होतं. या हे सूर्यग्रहणही भारतातून दिसलं नव्हतं.