...यामुळे पायात काळा धागा बांधतात तरुणी, जाणून घ्या काय आहे खरं कारण

...म्हणून पायात काळा धागा बांधतात तरुणी

शैलेश मुसळे | Updated: Apr 14, 2018, 06:26 PM IST
...यामुळे पायात काळा धागा बांधतात तरुणी, जाणून घ्या काय आहे खरं कारण title=

मुंबई : तुम्ही नेहमी तरुणींच्या पायात काळा रंगाचा धागा बांधलेला पाहिला असेल. पण तरुणी पायात काळा धागा का बांधतात याचं कारण अनेकांना माहित नाही. आज तर अनेक मुलांच्या पायात देखील काळा धागा बांधलेला दिसतो. काळा रंग हा नजर लागू नये म्हणून तसा वापरला जातो. प्राचीन काळात काळा टिका लावण्याची पद्धत होती. ही परंपरा आज देखील सुरु आहे. पाया शिवाय हातात देखील काळा धागा बांधण्याची अनेकांना सवय असते. किंवा अनेक जण गळ्यात देखील काळा धागा बांधतात. लहान मुलांना नजर लागू नये म्हणून त्यांना काळा धागा बांधण्याची पद्धत अनेक काळापासून चालत आली आहे. 

वैज्ञानिक कारण

काळा धागा बांधण्यामागे काही वैज्ञानिक कारण देखील समोर आलं आहे. आपलं शरीर पंचतत्वापासून बनलं आहे. ज्यामध्ये पृथ्वी, वायु, अग्नि, जल आणि आकाश यांचा समावेश आहे. यातून मिळणारी ऊर्जा शरीराला शक्ती देते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते. तेव्हा या पंचतत्वापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत नाही पोहचत. यामुळे शरीरावर काळा धागा बांधला जातो. काही लोकं काळ्या धाग्यात देवाचं लॉकेट देखील घालतात. ज्यामागे त्यांची भावना असते.

काळा रंग उष्मा शोषक देखील असतो. काळा धागा वाईट नजर असो किंवा नकारात्मक ऊर्जा दोघांना शोषून घेतो. यामुळे त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होत नाही. 

आता बनली फॅशन 

पायात धागा बांधण्याची फॅशन देखील आली आहे. यामागे ज्योतिष किंवा वैज्ञानिक मान्यता आहे पण आता फॅशन म्हणून पायात काळा धागा बांधला जातो.