.... म्हणून घरातील वडिलधारी मंडळी चप्पल उलटी न ठेवण्याचा सल्ला देतात

आपल्या घरातील वडिलधारी मंडळी नेहमी आपल्याला चप्पल उलटी न ठेवण्याचा सल्ला देतात.  परंतु असं का सांगतात? या मागचं कारण बऱ्याच लोकांना माहित नाही.

Updated: Apr 26, 2022, 09:19 PM IST
.... म्हणून घरातील वडिलधारी मंडळी चप्पल उलटी न ठेवण्याचा सल्ला देतात title=

मुंबई : आपल्या घरातील वडिलधारी मंडळी नेहमी आपल्याला चप्पल उलटी न ठेवण्याचा सल्ला देतात. तसेच जर चप्पल उलटी झाली असेल, तर आपल्याला ते सगळ ठेवायला लावतात. परंतु वडिलधारी मंडळी असं का सांगतात किंवा असं का केलं जातं? या मागचं कारण बऱ्याच लोकांना अद्यापही माहित झालेलं नाही. खरंतर असं करण्यामागे अनेक कारणं समोर आलेली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की, चप्पल उलटी ठेवल्याने काय नुकसान होतं?

लक्ष्मीला राग येतो

असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट पडलेलं असेल, तर ते लगेचच सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि देवी लक्ष्मीला याचा रागही येतो. त्यामुळेच तुम्हा देखील कधी चप्पल उलटी पडलेली दिसली की, ती सरळ करा.

रोगराई वाढते

तसेच असे ही मानले जाते की, चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने घरामध्ये आजार आणि दुःख वाढतात. त्यामुळे चप्पल आणि बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर लगेच सरळ करा. तसेच वृद्ध मंडळी असे देखील सांगतात की, चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

विचारांवर वाईट परिणाम

घराच्या दारात चुकूनही चपला किंवा बुट उलटे ठेवू नयेत. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. वास्तूनुसार, उलटे शूज आणि चप्पल केल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते. त्यामुळे कुटुंबाच्या सुख-शांतीमध्ये खूप अडथळे येतात.

शनीचा प्रकोप कायम

असे मानले जाते की, घरात शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो. ज्यामुळे तुम्हाल गंभीर परिणामांना सामोर जावं लागू शकतं.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)