माघी गणेशोत्सव 13 फेब्रुवारी रोजी; बाप्पाला दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य!

Maghi Ganesh Jayanti 2024 Date: माघी गणेश जयंती कधी येणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जाणून घ्या बाप्पाला आवडणारा प्रसाद आणि मुहूर्त व वेळ 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 8, 2024, 03:41 PM IST
माघी गणेशोत्सव 13 फेब्रुवारी रोजी; बाप्पाला दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य!  title=
When is the Maghi Ganesh festival Date and puja rituals in marathi

Maghi Ganesh Jayanti Date 2024: महाराष्ट्रात दोनदा गणेश जयंती साजरी केली जाते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. तर, एकदा माघ महिन्यात गणपती बाप्पाचे घराघरात आगमन होते. माघ महिन्यातील शुल्क चतुर्थीच्या दिनी गणेश जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार आणि काही पौराणिम ग्रंथानुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. माघ महिन्यातील गणेश जयंतीला विनायकी चतुर्थीदेखील म्हटले जाते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच या दिवसांतच बाप्पाला दीड दिवस घरी आणले जाते. तर, मोठी मिरवणूक काढत बाप्पाचे विसर्जनदेखील करण्यात येते. या दिवसाचे खूप महत्त्व आहे. माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचे तत्व हजारपटीने वाढतात. 

माघ गणेशोत्सव कधी येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. यंदा 13 फेब्रुवारी रोजी माघी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील काही घराघरात दीड दिवसांचा बाप्पा येतो. दीड दिवसांनंतर त्याचे वाजत-गाजत विसर्जन करण्यात येते. तर, सार्वजनिक मंडळातही बाप्पाचे आगमन होते. यंदा 13 फेब्रुवारी रोजी माघी गणेशचतुर्थी आहे. गणेश पूजेचा मुहूर्त 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.40 वाजेपासून ते दुपारी 01.58 वाजेपर्यंत आहे. 

हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करण्याआधी गणेश पूजन केले जाते. हिंदू धर्मात भगवान गणेशाला पूजेचा पहिला मान मिळाला आहे. माघी गणेश चतुर्थीला बाप्पाच्या प्रसादासाठी तिळाचा जास्त वापर करण्यात येतो. बाप्पाच्या नैवेद्यासाठी केल्या जाणाऱ्या मोदकांमध्येही तिळ आणि गुळ याचा वापर केला जातो. राज्यातील काही भागांत हळद किंवा सिंदूरपासून गणेश मूर्ती बनवली जाते. माघी गणेश चतुर्थीला श्रींची विधिवत पूजा करुन दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. 

माघी गणेश जयंतीला गणपतीची पूजा केल्याने संपूर्ण वर्ष घरात समृद्धी नांदते, हे व्रत केल्यास घरात सुख-शांती वाढते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )