हिंदू धर्मात लहान मुलांचं मुंडण का केलं जातं? अंधश्रद्धा नाही, यामागील कारण वैज्ञानिक

अनेकदा हिंदू कुटुंबांमध्ये जन्माच्या वेळी, मुलगा झाला तर एखाद्या ठिकाणी येऊन मी मुलाचे मुंडण करेन असं लोक म्हणतात.

Updated: Jun 22, 2022, 07:19 PM IST
हिंदू धर्मात लहान मुलांचं मुंडण का केलं जातं? अंधश्रद्धा नाही, यामागील कारण वैज्ञानिक title=

मुंबई : भारतात अनेक धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नियम आणि कायदे असतात. हिंदूंमध्ये देखील इतर अनेक नियम आहेत. अगदी मुलाच्या जन्मापासून ते लग्न, अंत्यसंस्कार आणि सणांपर्यंत लोकांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मुंडण सोहळा. हा सोहळा हिंदू घरात जन्माला आलेल्या मुलाचा केला जोतो. मुंडन हा हिंदूंच्या 16 संस्कारांपैकी एक मानला जातो.

त्यांपैकी काहींकडे मुलगा आणि मुलगी दोघांचे मुंडण करतात, तर काही लोक फक्त मुलांचे मुंडण केले जाते. परंतु असे असले तरी, मुळात हे मुंडण का केले जाते? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? चला या मागचं कारण जाणून घेऊ.

अनेकदा हिंदू कुटुंबांमध्ये जन्माच्या वेळी, मुलगा झाला तर एखाद्या ठिकाणी येऊन मी मुलाचे मुंडण करेन असं लोक म्हणतात. ज्यामुळे ते आपल्या मुलाचे केस त्या ठिकाणाला जाऊन देतात. हे लोकांनी नवस केल्यामुळे केलं जातं.

परंतु तुम्हाला माहितीय का की, जन्माला आलेल्या लहान मुलाचं मुंडण करण्यामागेही एक विज्ञान दडलेले आहे, जे फारच कमी लोकांना ठावूक असेल. होय, जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर मुलाच्या डोक्यावरील केस काढण्याला खूप महत्वाचे आहे.

हे आहे मुंडण करण्यामागचे शास्त्रीय कारण-

- नऊ महिने आईच्या उदरात राहून मूल जेव्हा या जगात येते, तेव्हा त्याच्या डोक्यात अनेक जंतू असतात. हे जंतू आणि बॅक्टेरिया शॅम्पूनेही काढता येत नाहीत. यामुळे, मुलांचे केस काढले जातात. ज्यामुळे हे सर्व जंतू आणि बॅक्टेरिया निघून जातात.

- मुलांच्या डोक्यावरचे केस काढल्याने त्यांच्या शरीराचे तापमानही नियंत्रित होते. मुलाचे मुंडण केल्यावर त्याला फोड, मुरुम, जुलाब यांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळते. त्याच वेळी, त्याचे डोके देखील थंड राहाते.

- मुंडण केल्यावर, मुलाच्या डोक्यावरील सर्व केस काढले जातात, ज्यामुळे सूर्यप्रकाश थेट त्याच्या डोक्यावर पडतो. हा सूर्यप्रकाश मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पेशी कार्यान्वित होतात आणि नसांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो.

- मुंडण केल्याने मुलांना सहज दात येतात असा एक वैज्ञानिक समजही आहे. सामान्यतः जेव्हा मुलाचे दात येतात, तेव्हा त्याला जुलाब होऊ लागतो. यासोबतच तापही येतो. पण मुंडण केले तर दात येण्यास फारशी अडचण येत नाही.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)