Weekly Tarot Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 'या' राशींची संपत्ती होणार दुप्पट? जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 3 to 9 June 2024 in Marathi : जूनच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार असल्याने तो काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. अशात जूनचा हा आठवडा  मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी कसा असेल जाणून घ्या  टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

Updated: Jun 2, 2024, 09:57 AM IST
Weekly Tarot Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 'या' राशींची संपत्ती होणार दुप्पट? जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य 	  title=
weekly tarot horoscope prediction tarot card reading for 2 to 9 June 2024 saptahik rashi bhavishya in marathi

Weekly Tarot Horoscope Prediction 3 to 9 June 2024 in Marathi : जूनच्या पहिल्या आठवडा हा अनेक राशींसाठी वरदान ठरणार आहे. या आठवड्यात वृषभ राशीत शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. हा योग काही राशींसाठी कुबेरचा खजिना मिळण्याची संधी निर्माण करणार आहे. अशात टॅरो कार्डनुसार मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी जूनचा पहिला आठवडा कसा राहील हे जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

मेष (Aries Zodiac)  

टॅरो कार्डच्या गणनेनुसार या राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपण आपल्या लक्ष्याबद्दल पुरेसे गंभीर राहणार नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळणार असून कौटुंबिक जीवन सुसंवाद राहणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

टॅरो कार्ड्स गणनेनुसार या राशीच्या लोकांना या आठवड्यात खूप काळजीपूर्वक काम करावे लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. बाहेरचे अन्न खाऊ नका. वैवाहिक जीवनातील नातेसंबंध काहीसे आंबट आणि काहीसे गोड असणार आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

टॅरो कार्ड्स गणनेनुसार या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्यावे लागणार आहे. त्यांना शक्य तितका वेळ द्या आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणे तुमच्या संसारासाठी बरं होईल. अनावश्यक भांडणे टाळा. एका किंवा दुसऱ्या गोष्टीबद्दल तणाव राहणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड वाढणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

या राशीचे लोक जूनच्या पहिल्या आठवड्यात सामाजिक कार्यात सक्रिय असणार आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला व्यावसायिकांकडूनही पूर्ण सहकार्य मिळणार आहे. मित्रांकडून तुम्हाला आदर मिळणार आहे. प्रेम जीवनाच्या बाबतीत आठवडा तुमच्या बाजूने नसणार आहे. प्रेमातही काही मतभेद होण्याची शक्यता आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा थोडा त्रासदायक असणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य प्रतिकूल असणार आहे. तुमच्यासाठी हा कसोटीचा काळ राहणार आहे. त्यामुळे तुम्ही थोडे सावध राहण्याची गरज आहे. तसंच, या आठवड्यात तुमचं काम तुमच्या योजनेनुसार होणार नसल्याने तुम्ही चिंतेत असणार आहात. तरीही नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांसाठी, तुमचा प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती या आठवड्यात त्यांच्या शिखरावर येणार आहे. तसंच, या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन खूप अनुकूल असणार आहे. तुम्हाला तुमचा जोडीदार, मुलं आणि कुटुंबातील इतरांकडून पूर्ण सहकार्य मिळणार असून घरात शांती आणि आनंद असणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा मीडियाशी संबंधित क्षेत्रात देखील फायदे राहणार आहे. दिखाऊपणापासून दूर राहणे हिताच ठरेल. या आठवड्यात तुमच्या नवीन योजना सुरू होणार आहे. या आठवड्यात तुम्ही वरिष्ठांना भेटाल आणि त्यांच्या मदतीने तुम्ही काही नवीन काम सुरू करणार आहात. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा लकी ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी लोकांकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. तसंच कुटुंबात सुख-शांती नांदेल. प्रेम संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होणार आहे. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही थोडे महत्वाकांक्षी असणार आहात. 

धनु (Sagittarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा लकी असणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. जुने मित्र भेटल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. मित्रांकडून मदत घेण्यास मागेपुढे पाहू नका. जास्त काम करणे टाळा. अन्यथा तुम्ही नाराज होऊ शकता. 

मकर (Capricorn Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी जूनचा आठवडा आर्थिक बाबतीत भाग्यवान ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीत अधिक फायदा दिसणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारसा चांगला नसणार आहे. पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात जवळजवळ प्रत्येक स्तरावर समायोजन करणे खूप महत्वाचे ठरणार आहे. तुम्हाला धीर धरावा लागणार आहे. गोष्टींमध्ये त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप करु नका. पदोन्नतीची संधी असणार आहे. यावेळी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तुमच्या बाजूने वापरण्यास सक्षम राहणामर आहे. 

मीन  (Pisces Zodiac) 

मीन राशीचे लोक या आठवड्यात यशाच्या पायऱ्या चढणार आहेत. नोकरदार लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. तुम्ही सध्या जे काही करत आहात आणि तुम्ही करत असलेले संपर्क भविष्यात फायदेशीर ठरणार आहेत. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)