Weekly Horoscope : 10 ते 16 जुलै 2023; काहींनी आरोग्याची काळजी घ्यावी तर काहींना मिळणार वेतनवाढ

या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्ती कुटुंबासाठी काही मौल्यवान वस्तू खरेदी करण्याच्या तयारीत असतील. तर काहींनी घरात वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!

सुरभि जगदीश | Updated: Jul 9, 2023, 01:38 PM IST
Weekly Horoscope : 10 ते 16 जुलै 2023; काहींनी आरोग्याची काळजी घ्यावी तर काहींना मिळणार वेतनवाढ title=

Horoscope Weekly (10 July to 16 July 2023): येत्या 10 जुलैपासून नवा आठवडा सुरु होणार आहे. या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्ती कुटुंबासाठी काही मौल्यवान वस्तू खरेदी करण्याच्या तयारीत असतील. तर काहींनी घरात वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात काही नकारात्मक व्यक्ती गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा. चांगले विचार समोर ठेवून मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारून टाका. वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमचे काम नक्कीच होईल.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीचे लोक या आठवड्यात अधिक व्यस्त राहणार आहेत. ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवा. घरात खूप दिवसांपासून कोणतेही धार्मिक कार्य होत नसेल तर या आठवड्यात तुम्ही ते काम करून घेऊ शकता. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. या आठवड्यात षड्यंत्रांपासून सावध राहा. कामाला गती कशी द्यायची याची चिंता तरुणांना सतावेल. महिलांना काही हार्मोनल विकारांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनी ऑफिसला जाण्यापूर्वी त्यांच्या प्रमुख कामांची यादी तयार करावी. तरुणांना या आठवड्यात त्यांच्या बोलण्याने लोकांचे समाधान करता येईल. जुन्या मित्राकडून लाभही मिळू शकतो. कुटुंबात आनंद कायम राहील. 

सिंह (Leo)

सिंह राशीचे लोक कामाच्या ठिकाणी वेतनवाढ आणि पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायाशी निगडीत काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवता येतील. कुटुंबातील ज्येष्ठ लोकांसोबत वेळ घालवा.

कन्या (Virgo)

कन्या राशीचे लोक या आठवड्यात येणाऱ्या समस्यांचं आकलन करतील. या आठवड्यात व्यावसायिक भागीदारासोबत कोणत्याही प्रकारे अविश्वास येऊ देऊ नका. व्यवसायात पारदर्शकता ठेवा. वडिलांशी मतभेद वाढू देऊ नका. आरोग्याची देखील काळजी घ्या. 

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांनी असं कोणतंही काम करू नका की तुमची वाईट प्रतिमा पोहोचेल. मोठ्या भावासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. भावाशी वाद टाळणे चांगले. 

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात यश मिळू शकतं. तरुणांच्या मनात विचार विपुल प्रमाणात येतील. या व्यक्तींनी निष्काळजीपणा टाळावा, काही समस्या येण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी ताळमेळ राखावा. सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कठोर परिश्रमाच्या बळावर तुम्ही लवकर यश मिळवू शकाल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. 

मकर (Capricorn)

या आठवड्यात परदेशी कंपन्यांच्या उत्पादनांची खरेदी-विक्री करणारे व्यापारी यावेळी मोठा नफा कमवू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडासा संघर्ष करावा लागेल. दैनंदिन दिनचर्येत योगाचा समावेश करा.

कुंभ (Aquarius)

या राशीच्या व्यापाऱ्यांनी अनावश्यक कामांसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावू नये. अनावश्‍यक खर्चावर कडक नजर ठेवावी लागेल. कुटुंबातील खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर बजेट बिघडू शकते. 

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांनी अधिकृत कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावं. फायनान्सशी संबंधित काम करणाऱ्यांना कायदेशीर बाबीपासून दूर राहावं. या आठवड्यात काही मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )