Vipreet Rajyog : 12 वर्षांनंतर गुरुने तयार केला 'विपरीत राजयोग'; 'या' राशींच्या हाती लागणार कुबेराचा खजिना

Vipreet Rajyog : गुरू मेष राशीत बसल्यामुळे विपरीत योग तयार झालाय. विपरीत योगाच्या प्रभावामुळे धनप्राप्तीसोबतच प्रतिष्ठा देखील मिळणार आहेत. पाहूयात या 2 राशी कोणत्या आहेत. 

Updated: Jun 18, 2023, 11:38 PM IST
Vipreet Rajyog : 12 वर्षांनंतर गुरुने तयार केला 'विपरीत राजयोग'; 'या' राशींच्या हाती लागणार कुबेराचा खजिना title=

Vipreet Rajyog : भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार, देवतांचा गुरू बृहस्पति देवाने एप्रिल महिन्यात गोचर केलं. यावेळी बृहस्पति देवाने मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश केला. यावेळी तब्बल 12 वर्षांनंतर ही परिस्थिती समोर आलीये. यावेळी गुरू मेष राशीत बसल्यामुळे विपरीत योग तयार झालाय. 

या विपरीत राजयोगाचा दोन राशीच्या व्यक्तींना भरपूर फायदा होणार आहे. विपरीत योगाच्या प्रभावामुळे धनप्राप्तीसोबतच प्रतिष्ठा देखील मिळणार आहेत. पाहूयात या 2 राशी कोणत्या आहेत. 

कसा बनतो विपरीत योग?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बृहस्पति हा मेष राशीच्या नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे. यावेळी त्यांनी भाग्याच्या घरात प्रवेश केला आहे. एका राशीमध्ये 6व्या, 8व्या आणि 12व्या घरातील स्वामी युती करतात तेव्हा विपरीत योग तयार होतो. 

या राशींना होणार फायदा

मिथुन रास

गुरुच्या गोचरमुळे हा विपरीत योग तयार झाला असून मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग लाभदायक ठरणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात केलेली गुंतवणूक तुम्हाला नफा देणार आहे. बरेच दिवस रखडलेली कामं पूर्ण होऊ होणार आहे. तुम्हाला परदेशी जाण्याची इच्छा असेल तर स्वप्न पूर्ण होणार आहे. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा मिळणार आहे.

कर्क रास

बृहस्पति हा नवव्या घराचा स्वामी आणि कर्क राशीच्या सहाव्या घराचा स्वामी आहे. या राशीच्या दहाव्या घरात गुरुचं गोचर झालं आहे. विपरीत योगाचा या राशींना चांगलाच फायदा मिळणार आहे. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. कुटुंबामध्ये असलेले वाद संपुष्टात येणार आहेत. प्रदीर्घ प्रलंबित वेतनवाढ होऊ शके शकते. धनलाभंही होणार आहे. वैवाहिक जीवनातच आनंद येणार आहे. करियरमध्येही विद्यार्थी उच्च स्थान गाठू शकणार आहेत.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )