Shukra-Shani Yuti: बऱ्याच वर्षांनी होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता

Shukra-Shani Yuti: आगामी काळात शनि आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती तिन्ही राशीच्या व्यक्तींना धनवान बनवणार आहे. 2024 मध्ये शुक्र कुंभ राशीत आणि 2025 पर्यंत शनी कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 16, 2023, 10:35 AM IST
Shukra-Shani Yuti: बऱ्याच वर्षांनी होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता title=

Shukra-Shani Yuti: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांचा संयोग होतो. ग्रहांच्या या युतीचा परिणाम सर्व 12 राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. अशातच आता 30 वर्षांनंतरही दोन ग्रहांचा संयोग होणार आहे. 

आगामी काळात शनि आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती तिन्ही राशीच्या व्यक्तींना धनवान बनवणार आहे. 2024 मध्ये शुक्र कुंभ राशीत आणि 2025 पर्यंत शनी कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर अशी स्थिती निर्माण होणार आहे. शुक्र आणि शनीच्या या संयोगाने काही राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार आहे.

मेष रास

कुंभ राशीत शुक्र आणि शनीच्या युतीमुळे मेष राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात शुक्र आणि शनीचा हा संयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. हा काळ फायदेशीर ठरेल. तुमच्या आयुष्यात चांगली बातमी येईल. 

वृषभ रास 

या राशीच्या दहाव्या घरात शुक्र आणि शनीची युती होणार आहे. या काळात तुम्ही जे काही काम करत आहात तर प्रगती होईल. नोकरी करत असाल तर पदोन्नतीची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे शुभ फळ मिळतील. 

मिथुन रास 

या राशीच्या नवव्या घरात शुक्र आणि शनीची युती होणार आहे. तुम्हाला पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळणार आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. 

सिंह रास

सिंह राशीच्या सातव्या घरात शुक्र आणि शनीची भेट होणार आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात भागीदारीतून चांगला लाभ मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या भाग्याचा लाभ मिळणार आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )