VASTUSHASTRA TIPS FOR POSITIVITY: घरात सकारात्मक ऊर्जा असावी घरात प्रसन्न वाटावं म्हणून आपण काही प्लांट्स घरात लावतो काही फुलझाडं असतात तर काही बिना फुलांची असतात .यात शोभेची झाडं असतात.
पण तुम्हाला माहीत आहे का काही प्लांट्स असे आहेत जे तुम्ही घरात चुकूनही लावता काम नये..घरात सकारात्मक ऊर्जा येण्याऐवजी नेगेटिव्ह एनर्जी घरात येऊन तुमचं नुकसान होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती झाडं आहेत जी आपण घरात चुकून लावली असतील तर काढून टाकायला हवीत
1 मेहेंदीच झाड
वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा घराबाहेर हे झाड लावू नये याने प्रचंड नकारात्मक ऊर्जा येते असं म्हटलं जात .इतकंच नाही तर कोणाला भेट म्हणूनसुद्धा हे झाड देऊ नये किंवा भेटस्वरूपात घेऊ नये.
2 बाभळीचं झाड
हे झाड तास औषधी मानलं जात पण घरात किंवा घराबाहेर हे झाड न लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रानुसार दिला जातो .हे झाड काटेरी असत म्हणून नेगेटिव्ह एनर्जी पसरते असं म्हटलं जात .हे झाड घरात असेल तर घरात भांडण किंवा मानसिक क्लेश निर्माण होतो असं सांगितलं जात.
3 सुकलेली झाडं
वास्तुशास्त्र सांगते कि, घरात सुकलेलं झाड किंवा खराब सडलेलं झाड लावू नये,यामुळे घरात नेगेटिव्हिटी येते होणारी काम होत नाहीत आणि नुकसान होतं.
4कापूस किंवा रेशम
काहीजण घर सजवण्यासाठी घरात कॉटन आणि सिल्कचे प्लांट्स आणतात पण वास्तू शास्ञानुसार पाहिलं तर ही दोन्ही प्लांट्स बाहेरील धूळ आणि घाण आपल्याकडे खेचून घेतात आणि त्यामुळे घर तर घाण होतचं पण त्याच्याशिवाय नेगेटिव्हिटी येते. आणि ही दोन्ही प्लांट्स घरात लावण्यासाठी अशुभ मानली जातात.