मुंबई : तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. इतकेच काय तर, तुळशीला आयुर्वेदात देखील महत्वाचं स्थान आहे. ज्यामुळे बहुतांश हिंदू लोकांच्या घराबाहेर आपल्याला तुळशीचं रोपटं पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं की, तुळशीचं रोपटं घरात ठेवल्याने घरात सुख आणि शांती राहाते. परंतु तुळशीचं रोप घरात ठेवून देखील तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदत नसेल, तर मग तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जाते. तुळशीच्या पानांचा उपयोग पूजेत केला जातो, ज्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते त्या घरात नेहमी सुख-समृद्धी राहते. घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने माँ लक्ष्मी वास करते. घरातून नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
त्यामुळे तुमच्या घरात आधीपासून तुळशीचे रोप आहे किंवा ते लावायचे असेल, तर नक्कीच दिशेची काळजी घ्या. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. शक्यतो तुळशीचं झाडं हे पूर्व दिशेलाच लावा.
घराच्या दक्षिणेला तुळशीचे रोप लावू नका, तसेच तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला घाण होणार नाही याची काळजी घ्या. आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला हात लावू नक. तसेच त्याच्याजवळ शूज आणि चप्पल ठेवू नका.
तुळशीची पाने तोडताना लक्षात ठेवा की एकादशी, रविवार आणि मंगळवारी दिवस नसावा.
तुमच्या घरात तुळशीचे रोप आहे आणि जर तुम्ही आर्थिक अडचणीतून जात असाल, तर तुम्ही सोप्या उपायांचा फायदा घेऊ शकता. तुळशीचे मूळ चांदीच्या तावीजमध्ये टाकावे आणि ते घालावे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)