Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला उंदीर मामा दिसले तर...'हे' आहेत शुभ-अशुभ संकेत

...याचा अर्थ असा की तुमचं महत्त्वाचं काम बिघडणार आहे आणि तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.

Updated: Aug 29, 2022, 05:22 PM IST
Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला उंदीर मामा दिसले तर...'हे' आहेत शुभ-अशुभ संकेत title=
trending Ganesh Chaturthi 2022 rat in the house on the day jyotish shastra say good and bad sign

Ganesh Chaturthi 2022: गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे घरोघरी गणरायाचा स्वागताची जोरदार तयारी झाली आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा बुधवारी 31 ऑगस्ट मोठ्या जल्लोषात गणपतीचे वाजतगाजत स्वागत होणार आहे. देशभरामध्ये गणेश चतुर्थीचा दिवस अतिशय खास असतो. गणपतीसोबत त्यांचे वाहक म्हणजे उंदीर मामाला विशेष महत्त्वं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदराचे दर्शन हे काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देतात.

गणेश चतुर्थीला उंदीर मामा दिसले तर...

1. गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर घराबाहेर जाताना दिसला तर ते शुभ चिन्ह आहे. म्हणजे उंदीर तुमच्या घरातील सर्व गरिबी आणि संकटे काढून घेत आहे. यानंतर घरात सुख-समृद्धी नांदेल, असं ज्योतिषशास्त्रात सांगणात आलं आहे. 

2. गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाचा उंदीर दिसला तर हे शुभ संकेत आहे. पांढरा उंदीर सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो आणि त्याचं दिसणं म्हणजे तुमच्या घरातील सर्व संकटं नाहीशी होणार. 

3. गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला तर चुकूनही मारू नये असे ज्योतिषशास्त्राचं मत आहे. उंदीर घरात नकारात्मकता आणतो आणि घरातील सदस्यांची बुद्धी भ्रष्ट करतो. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसल्यावर त्याला मारू नका, तर पळवण्याचा प्रयत्न करा.

4. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर उंदीर दिसला तर ते अशुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की तुमचं महत्त्वाचं काम बिघडणार आहे आणि तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)