मेष - अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. दिवस उत्साहवर्धक आणि मनोरंजनात्मक असेल. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. जुन्या दुखण्यांमध्ये आराम मिळेल.
वृषभ - कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. मेहनतीने चांगले पैसे कमवाल. गेल्या अनेक दिवसांपासून राहिलेली कामे पूर्ण होतील. काही नवे संबंध जुळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. सक्रिय राहाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागतील. प्रवास होऊ शकतो.
मिथुन - घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. पैशांसंबंधी काळजी वाटेल. फालतू खर्च होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात समस्या वाढण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत सावध राहा. ऑफिसमध्ये तणावपूर्ण वातावरण राहील. पोटासंबंधी विकार होण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका.
कर्क - नोकरीत समस्या उद्भवू शकते. हट्टीपणामुळे वाद होण्याची शक्यता आहे. विचार करण्यात अधिक वेळ घालवू नका. अचानक एखादी समस्या येऊ शकते. कामात अचानक अडथळे आल्याने मूड खराब होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्या. झोप कमी असेल. डोकेदुखी आणि डोळ्यांची जळजळ होऊन त्रास होऊ शकतो.
सिंह - कुटुंबात सुख-शांती राहील. सामाजिक कामात सन्मान मिळेल. चांगल्या मित्रांची भेट होऊ शकते. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुप्तपणे तुमची मदत करू शकते. साथीदाराकडून आर्थिक मदत मिळू शकते.
कन्या - व्यवसायात वाढ होईल. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. नियमित कामांतून काही काळासाठी सुटका होऊ शकते. समस्या संपण्याची शक्यता आहे. मोठ्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे फायदा होऊ शकतो. आराम करा. तब्येतीची काळजी घ्या.
तुळ - नोकरी, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. या प्रयत्नांना यशही मिळेल. नशिबाची साथ मिळेल. साथीदारावर नाराज होऊ नका.
वृश्चिक - व्यवसायात कमी नफा होईल. कोणतेही नवीन काम सुरू करू नका. फालतू कामांमध्ये अधिक लक्ष राहील. विचार केलेली कामे पूर्ण न झाल्याने मूड खराब होऊ शकतो. अविवाहितांच्या प्रेम संबंधांमध्ये तणाव येऊ शकतो.
धनु - दररोजची कामे पूर्ण होतील. विचार करून घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. कुटुंबात, समाजात तुमचे महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. जेवणात मसालेदार पदार्थ खाऊ नका. साथीदारासोबत दिवस चांगला जाईल. साथीदारासोबत संबंध अधिक घट्ट होतील.
मकर - आज नवीन सौदे करू नका. पैसे खर्च होतील. कुटुंबातील सदस्य कठीण परिस्थितीत टाकू शकतात. आज तुम्ही केलेले प्लॅनिंग गुप्त ठेवा. कोणाशीही शेअर करू नका. वाद-विवाद होऊ शकतात. डोकेदुखी आणि पोटदुखी होऊ शकते.
कुंभ - आर्थिक तंगी संपेल. इनकम आणि खर्च योग्य राहतील. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. काम पूर्ण कराल. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या लोकांच्या संगतीचा फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
मीन - महाग वस्तूची खरेदी होऊ शकते. आज काही मोठा, नवीन निर्णय घेऊ शकता. सावध राहा. पैसे खर्च करताना विचार करा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा आणि कमी झोपेमुळे समस्या निर्माण होऊ शकतात.