राशीभविष्य 3 जानेवारी : 'या' राशींच्या मंडळींना व्यवसाय, नोकरीत मोठी संधी

आजचा दिवस असेल 'या' राशींसाठी खास

Updated: Jan 3, 2020, 09:16 AM IST
राशीभविष्य 3 जानेवारी : 'या' राशींच्या मंडळींना व्यवसाय, नोकरीत मोठी संधी  title=

मेष - काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. मेहनत अधिक करावी लागले. नोकरी बदलण्याचा निर्णय घेत असाल तरी विचारपूर्वक घ्या. कोणत्याही कामात घाईगडबडीने निर्णय घेऊ नका तुमचं नुकसान होऊ शकतं. आरोग्याबाबत सावध राहा. नवीन वस्तू घेण्याचा विचार करू शकता. 

वृषभ - व्यवसायात फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गाच्या कामात बढती मिळू शकते. सहकर्मचाऱ्यांकडून मदत मिळेल. जीवनसाथीच्या शोधात असाल तर सुवर्णयोग्य आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेम मिळण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या गोष्टीत वाढ होईल. करिअरच्या गोष्टीत पुढे जाण्याची संधी मिळेल. 

मिथुन - आज ग्रहांची स्थिती उत्तम असेल. आज तुम्ही सक्रिय असाल. ऑफिसमध्ये नव्या जबाबदारी मिळतील. रखडलेली सर्व काम आज पूर्णत्वाकडे जातील. पार्टनरकडून मानसिक आधार मिळेल. सामाजिक आणि सामूहिक कामांमध्ये लोकांचा सहभाग मिळेल. 

कर्क - आज तुम्ही ऑफिसमध्ये लोकांना इम्प्रेस कराल. नोकरी बदलण्याचा किंवा अधिक कमाईचा विचार करू शकता. नवीन सुरूवात केल्यास त्यामध्ये यश मिळेल. अडकलेला पैसा पुन्हा मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक फायदा होऊ शकतो.

सिंह - अधिकाऱ्यांची मदत मिळेल. व्यवसायात सावधान राहा. ऑफिस आणि बिझनेसमध्ये जे काम हाती घ्याल त्याला यश मिळेल. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. अर्धवट राहिलेली सर्व कामे आज पूर्ण होतील. 

कन्या - आज बिझनेस आणि नोकरीत वरच्या स्तरावर मोठे निर्णय होऊ शकतात. आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होईल. पगारवाढीवर आज विचार करू शकता. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची संधी. कुणालाही आज फुकटचा सल्ला देऊ नका. 

तूळ - काही रखडलेली काम आज पूर्ण कराल. काही लोकं तुमच्या विरोधातील जातील मात्र तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. लग्नाचा योग आहे त्या दृष्टीकोनातून हालचाली करा. शरिराकडे थोडं लक्ष द्या. 

वृश्चिक - व्यवसायात फायदा होईल. नोकरीपेशातील लोकांना आजचा दिवस चांगला आहे. रखडलेली काम आज नक्की पू्र्ण होतील. शत्रूंना देखील आज जवळ कराल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाला पूर्णवेळ द्या. 

धनू - नोकरदारवर्गासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकरता आजचा दिवस खास असेल. कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. लवलाइफमध्ये बदल होण्याची दाट शक्यता. 

मकर - जुनी संकट आज दूर होतील. रखडलेली सर्वकाम उत्तम पद्धतीने पूर्ण होतील. आजचा दिवस अधिक एनर्जीचा असेल त्यामुळे सर्व काम नीट सावधपणे करा. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत राहा. 

कुंभ - या राशीच्या लोकांना करिअरमध्ये उत्तम संधी आहे. ऑफिसमध्ये सहकार्यांकडून मदत मिळेल. प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये नीट लक्ष द्या. महत्वपूर्ण लोकांच्या आज गाठीभेटी होतील. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा अन्यथा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. लहान मुलांकडून खास आनंद मिळेल. 

मीन - अचानक फायदा होईल. पार्टनरकडून चांगली साथ मिळेल. धन लाभ होण्याची दाट शक्यता. जुनी कर्ज फेडण्यास सुरूवात कराल. खर्च आटोक्यात आणा. नोकरी आणि व्यवसायाच आजचा दिवस महत्वाचा. वातावरणातील बदलाचा शरिराला त्रास होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.