आजचे राशीभविष्य | शनिवार | ३ ऑगस्ट २०१९

कसा आहे तुमचा आजचा दिवस

Updated: Aug 3, 2019, 10:06 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | ३ ऑगस्ट २०१९ title=

मेष - आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतात. काही मित्रांशी भेट होऊ शकते. डोक्यात सतत काहीतरी सुरु राहील. ऑफिसमध्ये सहकार्यांची मदत होईल. तुमच्या सल्ल्याने इतरांना फायदा होऊ शकतो.

वृषभ - योग्य प्लॅनिंग आणि विचार करुन केलेल्या कामात यश मिळेल. विचार केलेली काम पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरीत, दररोजच्या कामात बदल करण्याचा विचार करु शकता. विद्यार्थ्यांना यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन - आज काही नवीन प्रयोग करु शकता. आत्मविश्वास वाढेल. मनात येणाऱ्या गोष्टींवर विचार करा. नात्यात सहजता वाढेल. लोकांसोबत तुमचा ताळमेळ असेल. जोडीदारासोबत वेळ व्यतित करण्याची संधी मिळेल. कुटुंबिय किंवा मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता.

कर्क - प्रयत्न केल्यास चांगले यश मिळेल. आज तुमच्या बोलण्याने अनेकांची सहमती मिळवू शकता. सहकार्य आणि समजदारी करण्याचा विचार करुनच घरातून बाहेर पडा. काही वेळ एकांतात राहाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. ऑफिस किंवा इतर ठिकाणी तडजोड करावी लागू शकते. ज्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल.

सिंह - तुमचं काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न कराल. आज दिवसभर व्यस्तता राहील मात्र, दिवस चांगला जाईल. सकारात्मक राहाल. कुटुंबियांची मदत होऊ शकते. व्यवसायात धनलाभाची शक्यता आहे. मुलांविषयी ताण कमी होईल.

कन्या - ऑफिसमध्ये अनेक कामात यश मिळेल. करियरसंबंधी असलेल्या प्रश्नांचे समाधन होऊ शकते. ताण घेऊ नका. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर अधिकारी खूश असतील. मित्रांची भेट होऊ शकते. व्यवसायिकांना रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. 

तुळ - स्वत:वर विश्वास ठेवा. माहिती मिळवा. लोकांना भेटा, गरज पडल्यास प्रवासही करु शकता. तुमच्या जीवनातील अनेक पैलूंमध्ये बदल होऊ शकतात. जुन्या गोष्टी आणि आठवणी विसरण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही मुक्त आणि उत्साही मनाने सर्वांचं ऐकतं काम कराल. तुमच्या राहणीमानात बदल करण्याचा विचार करु शकता.

वृश्चिक - ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरु करण्याचा विचार कराल. दुसऱ्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. एखाद्या अशा व्यक्तीची भेट होऊ शकते ज्याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडेल. पैशांसंबंधी गोष्टी लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. 

धनु - समस्या निपटण्यात यश मिळेल. मोठी गुंतवणूक केली असल्यास त्यात फायदा होऊ शकतो. पैसा गुंतवताना लोकांना भेटून, बोलून काही वेळ जाऊ द्या. दिवस वेगात व्यतित होईल. काही नवीन आणि मनोरंजक लोकांना भेटण्याचा योग आहे.

मकर - अतिशय नियमितता आणि धीराने केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. जबाबदारी पार पाडाल. विचार केलेली कामं पूर्ण होतील. काम किंवा प्रवास करताना तुमच्याकडे एकाहून अधिक पर्याय असू शकतात. सोबत असणाऱ्याचं तुमच्याकडे लक्ष असेल. ऑफिसमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. 

कुंभ - काही बदल घडण्याची सुरुवात आज होऊ शकते. तुमची चांगली वागणूक तुम्हाला यश मिळवून देईल, त्याशिवाय लोक तुम्हाला भेटण्यासाठीही उत्सुक असतील. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. सकारात्मक राहाल.

मीन - चांगल्या संधी मिळतील. नवीन संधींबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. ऑफिसमध्ये नवीन ऑफर किंवा पद मिळू शकते. धनलाभाची शक्यता आहे. प्रवास करावा लागू शकतो. दुसऱ्यांकडून बोलल्या गेलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामाने सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करा.

- डॉ. दीपक शुक्ल