आजचे राशीभविष्य | रविवार | १४ जुलै २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस

Updated: Jul 14, 2019, 09:45 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | १४ जुलै २०१९  title=

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे. विरोधकांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगती करण्याची संधी आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये तुम्ही नुकसानापासून दूर असाल. मित्रांची मदज मिळेल. विवाहप्रस्ताव येतील. 

वृषभ- तुमच्या मतांचा आणि कामाचा इतरांवर प्रभाव असेल. तुमचे विचार इतरांना पटतील. विविध कार्यक्रमांचं आमंत्रण मिळेल. कुटुंबाचं पूर्ण समर्थन मिळेल. दूरच्या मित्रांशी बोलणं होईल. एखादा असा प्रवास करावा लागू शकतो, ज्याचा पुढील काही दिवसांमध्ये फायदा होईल. 

मिथुन- आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थार्जनाच्या चांगल्या संधी मिळतील. ज्यामुळे तुम्हीही थक्क व्हाल. काही नवे मित्र भेटतील. तुमच्या आवडीच्या कामांसाठी अतिशय उत्सुक असाल. विचारदृष्टी सकारात्मक ठेवा. 

कर्क- करिअरच्या दृष्टीने प्रगती करण्यावर तुम्ही भर द्याल. थोडी मनमर्जी कराल, भावनिकही व्हाल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. दिवस सामान्यच असेल. ज्या गोष्टी तुम्हाला अडचणीच्या वाटत आहेत, त्याच पुढे जाऊन तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील. 

सिंह- सामाजिक वर्तुळात बऱ्यापैकी सक्रिय असाल. कठिण परिस्थितीतही काही व्यक्ती तुमची साथ देण्यासाठी तयार असतील. जास्तीत जास्त लोक तुमची साथ देतील. एखाद्या मित्राची नकळत पणे मदत होईल. मन प्रसन्न असेल. आर्थिक अडचणी दूर होतील. नवी जबाबदारी मिळेल. 

कन्या- दिवस सामान्य असेल. देवाणघेवाणीच्या व्यवहाराची आखणी कराल. जवळपास गोंधळाचं वातावरण असेल. काम आणि  मेहनत एकरासखीच असेल. पण, त्यातही तुम्हाला यश मिळेल. 

तुळ- तुमची कामं थांबणार नाहीत. संकोच दूर होतील. काही व्यक्ती तुमच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवतील. इतरांच्या गरजा लक्षात घ्या. समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचा अंदाज घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्यात त्याची मदत होईल. सर्व कामं वेळेत पूर्ण होतील. 

वृश्चिक- पद, वेतन किंवा तुमचे अधिकार वाढतील. कोणा एका नव्या ठिकाणी जाण्याचा योग आहे. साथीदारासोबतचं नातं आणखी दृढ होईल. अनेक विचारांनी मनात काहूर माजवलेला असेल. ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. वास्तवदर्शी विचारांच्या दिशेने जा. अर्थार्जाच्या निमित्ताने एखाद्या प्रवासाला जावं लागू शकतं. 

धनु- महत्त्वाच्या व्यक्तींशी चांगला ताळमेळ असेल. आर्थिक स्थितीविषयी विचार कराल. नवी जबाबदारी मिळेल. काही कठिण विषयांवर तोडगा निघेल. कुटुंबात एकी ठेवा. 

मकर- व्यापार आणि नोकरीमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी घडण्याचे संकेत आहेत. एखाद्या खास विषयावर चर्चा होईल. महत्त्वाच्या भागिदारीतही प्रगती होण्याचे संकेत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचा सल्ला घ्या. 

कुंभ- जुनी नाती आणखी दृढ होतील. एखाद्या जास्तीच्या कामाची जबाबदारी मिळेल. इतरांची मदत मिळेल. काही अनपेक्षित अनुभव मिळतील. वडिलांची मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी साथीदाराचं सहकार्य लाभेल. 

मीन- जीवनात एखादा मोठा बदल होऊ शकतो. अडचणी कमी होतील. मनात चालणाऱ्या विचारांविषयी अधिकाधिक विचार कराल. अधिक गोष्टींवर तोडगा निघेल. प्रेमप्रकरणांमध्ये यश मिळेल.