आजचे राशिभविष्य | रविवार | 24 फेब्रुवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Sep 27, 2019, 08:22 AM IST
आजचे राशिभविष्य | रविवार | 24 फेब्रुवारी 2019  title=

मेष : नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची मदत मिळेल. आज खूप साऱे काम करावे लागेल. पण कामाला घाबरू नका. जोडीदाराकडून प्रेम आणि सुख मिळेल. धन लाभ होण्याचे योग आहेत. गुंतवणूक करण्याचे योग आहेत. नवी जागा खरेदी करु शकतात. कोणती चांगली संधी मिळू शकेल. आरोग्यात सुधार जाणवेल. 

वृषभ : व्यवसाय ठिक चालेल. उसने दिलेले पैसे मिळतील. जमीन जागेच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल. कर्जातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य आणि मार्ग सापडेल. पैशाशी संबधी प्रकरणी विचार करावी लागेल. वडीलांकडून पूर्ण मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. 

मिथून : द्विधा मनस्थितीमुळे कामात मन लागणार नाही. कोणती तरी चिंता वाटत राहील. वादात पडू नका. कामामध्ये एकाग्रता न होत असल्याने त्रास वाटेल. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. खर्च जास्त होईल. पोटाचे आजार संभावतात. मानसिक तणावात राहाल. 

कर्क : नशिब आणि वेळ तुमच्या बाजूने असेल. कोणते तरी काम बदलल्याने फायदा तुम्हाला होईल. जुनी कामे संपवायला आणि नवी सुरूवात करायला दिवस चांगला असेल. तुमची महत्त्वाची कामे पूर्व होतील. जोखीम असलेल्या कामात यश मिळेल. मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल. मित्रांची अनेक कामे तुमच्या मदतीने होतील. 

सिंह : काम आणि व्यवसायात विरोधकांवर विजय मिळेल. नवे काम देखील मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि यश मिळेल. धन लाभ होऊ शकतो. विरोधकांवर विजय मिळवाल. नोकरीमध्ये प्रगती कराल. जुन्या मित्रांची मदत मिळेल. मुलांकडून सुख आणि आर्थिक मदत मिळेल. 

कन्या : कार्यक्षेत्रामध्ये बढती होण्याचे योग आहेत. व्यवसायामध्ये धन लाभ होण्याचे योग आहेत. प्रेमी आणि जोडीदार तुम्हाला खूप मोठी मदत करतील. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याचे योग आहेत. प्रेमात यश मिळेल.  महत्त्वपूर्ण लोकांशी संपर्क कराल. तुम्हाला नव्या संधी मिळतील. 

तूळ : आरोग्याच्या समस्या उद्भवतील. काळजी घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणीही सावधान राहा. जोडीदारावर संतापू नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा. विचारपूर्वक बोललात तर दिवस चांगला जाईल. कार्यक्षेत्रात कोणता निर्णय घेऊ नका. दिवस धावपळीचा गेल्याने अंग आणि डोकेदुखी जाणवेल. 

वृश्चिक : अडकलेला पैसा पुन्हा मिळेल. वरिष्ठ आज तुमच्यावर खुश असतील. नवी जबाबदारी मिळेल. लव लाईफ चांगली राहील. पैशांच्या स्थितीत सुधार होईल. रोजच्या कामातून धनलाभ होईल. कोणत्या आवडत्या व्यक्तीशी ओळख होईल. तुमच्या तब्बेतीकडे लक्ष द्या. 

धनु : कनिष्ठांकडून मदत मिळेल आणि फायदा होईल. व्यवसायात नव्या योजना समोर येतील. आज तुम्हाला एक नवी सुरूवात करण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. जुन्या काळात कोणाची मदत केली असाल तर ती व्यक्ती अचानक तुमच्यासमोर येईल. प्रेमाच्या शोधात असाल. 

मकर : व्यवसायासाठी छोटा आणि फायदेशीर प्रवास होईल. नवी जबाबदारी मिळेल. नोकरीमध्ये यश मिळेल. काही नव्या संधी मिळतील. तुमच्या कामाचे कौतूक होऊ शकते. नव्या जबाबदारी मिळतील.  जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल. कुठेतरी फिरायला जाल. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला असेल. 

कुंभ : नोकरीमध्ये चांगले प्रदर्शन राहील. व्यवसायात फायदा होण्याचे योग आहेत. वरिष्ठांची तुम्हाला मदत मिळेल. जुने मित्र नोकरी मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करतील. पैशांच्या कामासाठी छोटा प्रवास करावा लागू शकतो. कुठूनतरी चांगली बातमी मिळेल. मनोरंजनामध्ये वेळ जाईल. आरोग्य चांगले राहील. 

मीन : तुमच्या कामकाजाची पद्धत थोडी बदलेल. नोकरी आणि व्यवसायात मन लागेल. काम कमी आणि कन्फ्यूजन जास्त असेल. प्रेमीसोबत भांडणे होतील. तुमच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. काही लोक तुमच्या मेहनतीचे क्रेडीट स्वत: घेतील. तुमची बाजू सर्वांसमोर सांगू नका. 

-दीपक शुक्ला