आजचे राशीभविष्य | बुधवार | २ ऑक्टोबर २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?  

Updated: Oct 2, 2019, 09:23 AM IST
आजचे राशीभविष्य | बुधवार | २ ऑक्टोबर २०१९ title=

मेष - आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. समजूतीने समस्यांवर मार्ग काढू शकता. दररोजच्या कामातून धनलाभाची शक्यता आहे. मुलांची मदत होऊ शकते. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. नोकरी-व्यवसायातील समस्या सुटतील. तब्येतीच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.

वृषभ - दिवसभर सावध राहावे लागेल. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्या समस्या वाढवू शकतात. सावध राहा. जुन्या गोष्टींमध्ये रमाल. एखाद्या समस्येवर लगेच मार्ग न मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामं अर्धवट राहू शकतात. कामात मन लागणार नाही. व्यवसायात आज कोणताही निर्णय घेऊ नका. 

मिथुन - व्यवसायात नवीन काही करण्याच्या नादात समस्या वाढू शकतात. मनातील विचारांमुळे कामात मन लागणार नाही. नोकरी, व्यवसायात घाई करु नका. प्रोफेशनल लाइफमध्ये टेन्शन वाढू शकते. कोणत्याही कामाचा रिझल्ट न मिळाल्यास ताण घेऊ नका. जेवण वेळेत करा. तब्येतीची काळजी घ्या.

कर्क - नोकरी, व्यवसायात अचानक निर्णय घ्यावा लागू शकतो. नुकसान होण्याची शक्यता आहे. गोंधळ होऊ शकतो. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. समस्या असल्यास सावधरित्या सोडवा. 

सिंह - विचार केलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. अनेक विचार मनात सुरु राहतील. पैसे संभाळून ठेवा. गुंतवणुकीबाबत विचार करुन निर्णय घ्या. कोणतीही योजना आज आखू नका. कटू बोलू नका. तब्येतीसाठी दिवस चांगला आहे.

कन्या - व्यवसायात काही नव्या योजनांवर काम सुरु होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. विचार केलेली कामं पूर्ण होऊ शकतात. महत्त्वपूर्ण लोकांशी भेट होऊ शकते. तुमच्या कामाकडे लक्ष द्या. तब्येत ठीक राहील. मन प्रसन्न राहील.

तुळ - दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन कामं पूर्ण करु शकता. कामात मन लागेल. अचानक नव्या संधी मिळू शकतात. त्याचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराची साथ मिळेल. तब्येत चांगली राहील. 

वृश्चिक - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा करु नका. विचारात असलेली कामं पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. 

धनु - मित्र-भावंडांकडून मदत मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. महत्त्वाच्या कामाची योजना आखू शकता. जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

मकर - नकारात्मक गोष्टीत अडकल्यास हातची संधी गमावली जाऊ शकते. कोणताही निर्णय घेऊ नका. विचार करुनच बोला. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. 

कुंभ - कामातील समस्या संपू शकतात. योजना सफल होऊ शकतात. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी दिवसा चांगला आहे. तब्येतीच्या बाबतीत सांभाळून राहा. 

मीन - नवीन काम मिळू शकते. दररोजची कामं पूर्ण होऊ शकतात. समस्या संपू शकतात. विचार करत असलेली कामं करण्यास सुरुवात करु शकता. महत्त्वपूर्ण कामसाठी दिवस शुभ आहे.