आजचे राशीभविष्य | २० ऑक्टोबर २०१९ | रविवारी

जाणून घ्या तुमचे आजच भविष्य 

Updated: Oct 20, 2019, 08:01 AM IST
आजचे राशीभविष्य | २० ऑक्टोबर २०१९ | रविवारी  title=

मेष - अनेक समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मोठी गुंतवणूक केली असेल तर फायदा नक्की आहे. पैसे गुंतवणूक करण्याबाबत तज्ञांशी चर्चा करा आणि तशी गुंतवणूक करा. दिवस घाईगडबडीत जाईल. काही मजेशीर आणि आवडीच्या व्यक्चीसोबत भेट होईल. 

वृषभ - स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांशी गाठीभेटी होतील आणि आवश्यक वाटल्यास प्रवास देखील होईल. जीवनात अनेक बदल होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गोष्टी ज्यांच्यामुळे त्रास होतो त्या विसरून जाण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करा. 

मिथुन - नवीन प्रयोग करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. आत्मविश्वास वाढण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मनाचा आवाज ऐका ज्यामुळे संबंध सुधारण्यास मदत होईल. लोकांसोबत संबंध चांगले ठेवा. 

कर्क - प्रयत्न केल्यास चांगली प्रगती होईल. महत्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास आज घ्या दिवस चांगला आहे. अचानक काही प्रश्न समोर उभे राहतील. ऑफिसमध्ये तडजो़ड करावी लागेल. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

सिंह - चांगली संधी आज मिळू शकते. नवीन प्लानिंग आणि संधी एकत्र चालून आल्यामुळे मोठे निर्णय घेऊ शकाल. नवीन नोकरी किंवा जुन्या नोकरीतच नवीन पद मिळण्याची दाट शक्यता. धन लाभ होणार, पैसे मिळवण्याची आणखी एक संधी चालून येणार. 

कन्या - ऑफिसमध्ये अनेक कामात यशस्वी व्हाल. करिअरमध्ये जर काही गोंधळ झाला असेल तर त्याचा फायदा होईल. त्रास करून घेऊ नका. प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. 

तूळ - योग्य तरतूद आणि योग्य विचार याची सांगड घालून मोठा फायदा होऊ शकतो. विचार केलेली काही महत्वाची काम आज पार पाडतील. खरेदी करणं देखील आज फायद्याच राहणार आहे. नवनवीन योजना आखून इतरांना प्रभावित करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. 

वृश्चिक - ऑफिसमध्ये अनेक नवीन जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. नवीन काम सुरू करण्यासाठी मनस्थिती निर्माण करा. दुसऱ्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका. दिवसभर सकारात्मक रहा. काम जास्त नसेल पण संपूर्ण दिवस खूप घाईगडबडीचा असेल. 

धनू - आर्थिक व्यवहार समजुतीने करा. जोडीदाराचा सल्ला घ्या फायदा होईल. पैसे मिळवण्यासाठी आणखी काही योजना आखा. नोकरीत चांगली संधी चालून येऊ शकते. सहकार्यांकडून नोकरीत मदत होईल. 

मकर - खूप संयम आणि नियमितपणा ठेवल्यास मेहनतीचं फळ मिळेल. त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. जुन्या मित्रांसोबत पुन्हा गप्पा होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळतील त्या पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. 

कुंभ - काही बदल आजपासून होतील. चांगला व्यवहार आज घडेल आणि त्यातून फक्त यश नाही तर आनंद देखील मिळेल. जोडीदारासोबत फिरण्याचे प्लान कराल. 

मीन -आज तुम्ही तुमचं काम पूर्ण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायला तयार असाल. दिवस कामाचा असेल पण आनंदात जाईल. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. सकारात्मक वातावरण असल्यामुळे फायदा होईल. कुटुंबात वयाने लहान असलेल्या व्यक्तींची मदत होईल.