Horoscope 10 July : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावं!

जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य कसं असणार आहे.

Updated: Jul 10, 2022, 08:03 AM IST
Horoscope 10 July : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावं! title=

मुंबई : मेष राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात उत्तम लाभ होणार आहे. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य कसं असणार आहे.

मेष  

आजच्या दिवशी तुम्हाला नवीन वाहन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. नवीन कामातून फायदा होईल.

वृषभ 

आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यांमध्ये आज सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडू नका.

मिथुन 

ज्येष्ठ व्यक्तींकडून आज आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबात आनंद राहील. घर बनण्याचा योग आहे.

कर्क  

या राशीच्या व्यक्तींनी नोकरीत बदल करु नये. शिवाय आजच्या दिवशी गाडी काळजीपूर्वक चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील.

सिंह

आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळणार आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका. मित्रांची साथ मिळणार आहे.

कन्या 

या राशीच्या व्यक्तींनी संध्याकाळपर्यंत आपलं काम पूर्ण करावं. आजच्या दिवशी अचानक दुखापत होईल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.

तूळ 

या राशीच्या व्यक्तींनी आज नवीन घर आताच खरेदी करु नये. स्थावर मालमत्तेची चिंता सतावेल. कुटुंबातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक

या राशीच्या व्यक्तींचा विदेश प्रवासाचा योग टळू शकतो. नोकरीत यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

धनु

मनाची चिंता संपेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. उधळपट्टी टाळण्याचा प्रयत्न करा.

मकर 

घरातील कलह संपुष्टात येईल. कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. पत्नीचा आदर करा.

कुंभ 

उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. जोडीदाराची तब्येत बिघडेल.

मीन 

ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. वाहन खरेदीचे योग पुढे ढकलले जाऊ शकतात. नातेसंबंधात गोडवा येईल.