Mangal Ketu Yuti : ज्योतिष शास्त्रानुसार, ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेशी अनेकदा दोन किंवा 3 ग्रहांचा संयोग होतो. यावेळी ग्रहांच्या युतीमुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडू शकतात. ग्रहांचा सेनापती मंगळ 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करत आहे. यावेळी केतू ग्रह आधीच उपस्थित असणार आहे. अशा स्थितीत मंगळ आणि केतूचा संयोग आहे. हा संयोग अशुभ मानला जातो.
काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात मंगळ आणि केतूच्या संयोगामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र 30 ऑक्टोबरला केतू आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा वेळी हा अशुभ संयोग संपेल. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे. केतू आणि मंगळाच्या अशुभ संयोगाच्या समाप्तीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मंगळ आणि केतूच्या अशुभ संयोगाच्या समाप्तीमुळे मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. या राशीमध्ये गुरु ग्रह आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होणार आहे. आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. शेअर बाजारात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला अपघाती पैसे मिळू शकतात.
मिथुन राशीच्या लोकांना मंगळ आणि केतूच्या अशुभ संयोगाच्या समाप्तीमुळे विशेष लाभ मिळू शकणार आहे. आर्थिक संकटातून सुटका मिळणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात पैशाची आवक वाढणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहे. कौटुंबिक मालमत्तेत तुम्हाला फायदा होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्येही तुम्हाला लाभ मिळतील. जर नोकरदार लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर ही खूप चांगली संधी आहे.
तूळ राशीच्या लोकांनाही बंपर लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीत बदलण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यवसायात प्रचंड यश आणि आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )